Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

खादीची ऑनलाइन एंट्री! आता सरकारी ई-शॉपिंग पोर्टलवर मिळणार जागतिक दर्जाचा अनुभव…

By Team Lagav Batti / June 9, 2026

तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी  आहे. कारण आता केंद्र सरकार लवकरच ‘खादी इंडिया’चं अत्याधुनिक ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च करणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी ही घोषणा केली आहे. या नव्या पोर्टलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे मोबाईल-फर्स्ट तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. ग्राहकांना उत्पादनांचे हाय-रिझोल्यूशन फोटो पाहता येतील, जलद आणि सुरक्षित ऑनलाईन पेमेंट करता येईल, तसेच ‘Shop The Look’ सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक फीचर्सही उपलब्ध असतील.

सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की आजच्या Gen Z पिढीला खादीकडे आकर्षित करणे आणि भारतीय खादी ब्रँडला जागतिक स्तरावर अधिक मजबूत ओळख मिळवून देणे. खादी क्षेत्राच्या वाढीचे आकडेही तितकेच आश्चर्यकारक आहेत. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये खादी उत्पादनांची विक्री सुमारे 31 हजार कोटी रुपये होती. ती वाढून 2025-26 मध्ये तब्बल 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यंदाच्या वर्षात ही विक्री 2.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फक्त विक्रीच नाही, तर रोजगाराच्या संधींमध्येही मोठी वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये खादी क्षेत्राशी जोडलेला रोजगार 1.30 कोटी होता, जो आता 2.04 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच कोट्यवधी हातांना रोजगार मिळवून देण्यात खादी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

एकूणच, नवीन ‘खादी इंडिया’ पोर्टल हे केवळ शॉपिंग प्लॅटफॉर्म नसून भारतीय परंपरा, रोजगार आणि डिजिटल भारत यांना जोडणारे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Previous

कुस्तीपटू ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार; कोण होते अनंतराव थोपटे?

Next

शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ? प्रसादाच्या पेढ्यांमध्ये बुरशी आढळल्याचा धक्कादायक दावा

Related Posts

मुंबई–नवी मुंबई मेट्रोलाइनला मंजुरी! 2 एअरपोर्ट जोडणारा हा गेमचेंजर प्रोजेक्ट

मुंबई–नवी मुंबई मेट्रोलाइनला मंजुरी! 2 एअरपोर्ट जोडणारा हा गेमचेंजर प्रोजेक्ट

Leave a Comment / तंत्रज्ञान / By Team Lagav Batti
Apple चा 2026 मधील पहिला मोठा इव्हेंट: स्वस्त मॅकबुक ते iPhone 17e पर्यंत मोठे सरप्राईज!

Apple चा 2026 मधील पहिला मोठा इव्हेंट: स्वस्त मॅकबुक ते iPhone 17e पर्यंत मोठे सरप्राईज!

Leave a Comment / तंत्रज्ञान / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top