Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

मुंबई–नवी मुंबई मेट्रोलाइनला मंजुरी! 2 एअरपोर्ट जोडणारा हा गेमचेंजर प्रोजेक्ट

By Team Lagav Batti / January 27, 2026

आज मुंबई-नवी मुंबईसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आली, ती म्हणजे मंत्रीभूत पायामंडळ समितीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाणाऱ्या 35 किलोमीटरच्या मेट्रोला मंजुरी दिली.. या मेट्रोपैकी जवळपास 9 किलोमीटर मेट्रो भुयारी असणार आहे, तर उरलेली संपूर्ण मेट्रो वरून, म्हणजे elevated जाणार आहे. खास करून कुर्ला सारखे जे खूप गजबजलेले आणि महत्त्वाचे भाग आहेत, ते या मेट्रोमुळे थेट जोडले जाणार आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही मेट्रो तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांना जाऊन मिळणारंय.
म्हणजे मेट्रो बदलणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं खूप जास्तं सोयीस्कर होणारंय. त्यामुळे मुंबई-नवी मुंबई दरम्यान जो प्रचंड ट्रॅफिकचा त्रास आहे, तो बराचसा कमी होईल, असा अंदाज आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च साधारणपणे 18 हजार कोटी रुपये इतका असेल आणि ही मेट्रो PPP तत्त्वावर उभी केली जाणार आहे. ज्यात केंद्र सरकार 20 टक्के आणि महाराष्ट्र सरकार 20 टक्के VGF देणार, आणि उरलेला सगळा खर्च ppp उचलेल. मूळ प्लॅननुसार ही मेट्रो 5 वर्षांत पूर्ण होणार होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय की, ही मेट्रो साडेतीन वर्षांतच पूर्ण झाली पाहिजे, म्हणून त्या दृष्टीने संपूर्ण प्लॅनिंगमध्ये बदल करण्यात येत आहेत. एकंदरीत पाहिलं तर,
ही मेट्रो फक्त दोन विमानतळ जोडणारी नाही,
तर मुंबई आणि नवी मुंबईमधला सगळा महत्त्वाचा भाग जोडणारी एक मोठी सोय ठरणार आहे.

Previous

भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळायला बांगलादेशचा नकार, आयसीसीचा BCB ला कडक इशारा…

Next

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

Related Posts

Apple चा 2026 मधील पहिला मोठा इव्हेंट: स्वस्त मॅकबुक ते iPhone 17e पर्यंत मोठे सरप्राईज!

Apple चा 2026 मधील पहिला मोठा इव्हेंट: स्वस्त मॅकबुक ते iPhone 17e पर्यंत मोठे सरप्राईज!

Leave a Comment / तंत्रज्ञान / By Team Lagav Batti
Flight Ticket Refund: ४८ तासांत विनादंड रद्द! DGCAच्या नव्या नियमांमुळे प्रवाशांना दिलासा

Flight Ticket Refund: ४८ तासांत विनादंड रद्द! DGCAच्या नव्या नियमांमुळे प्रवाशांना दिलासा

Leave a Comment / तंत्रज्ञान / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top