Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

महात्मा गांधींवर स्वयंपाक्याने विषप्रयोग केलेला पण…

By Team Lagav Batti / October 2, 2026

महात्मा गांधी हे देशाला लाभलेले असमान्य व्यक्तिमत्त्व. अहिंसेच्या जोरावर त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने पळवून लावलं. ब्रिटिशांना महात्मा गांधीं म्हणूनच जड जात असायचे.

त्यांनी अनेक पद्धतीने गांधींना संपवण्याचे प्रयत्न केले. अगदी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यापर्यंत ब्रिटिशांची मजल गेलेली. अगदी सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांकडून विषप्रयोग करण्यात आला होता. पण कसंय सत्यात मोठी ताकद असते. तेव्हा एक स्वयंपाकी गांधींच्या मदतीला धावून आला आणि त्यांचे प्राण वाचले.

ब्रिटिशांनी भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली, तेव्हा देशात नीळ आणि अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात असायची. या दोन पीकांमुळे ब्रिटिशांना भरपूर उत्पन्न मिळालं. ब्रिटिश भारतात राहून इथे खोऱ्याने पैसा कमावून परदेशात घेऊन जात होते. या पीकांच्या उत्पादनांमुळे ईस्ट इंडिया कंपनीला मोठा नफा होत होता. भरमसाठ नफ्यामुळे बंगाल, ओडिशा आणि बिहार या राज्यात या पिकांची शेती ब्रिटिशांनी अनिवार्य केली. अफू चीनमध्ये पाठवले जात. त्यातूनही त्यांना मोठा फायदा होत होता. नीळचं उत्पादन युरोपात पाठवून त्यातूनही मोठा नफा ब्रिटीश करून घेत होते. पण भारतातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं. जमिनीची उत्पादकता कमी होत होती.

याच काळात महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते. महात्मा गांधी यांना चंपारण येथील शेतकऱ्यांच्या समस्येविषयी माहिती मिळाली. महात्मा गांधी लागलीच चंपारणला गेले, तेथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याच चंपारण येथील प्रकल्पावर डब्ल्यू एस इरविन हा व्यवस्थापक होता. महात्मा गांधींनी चंपारणमधील शेतकऱ्यांची भेट घेतल्यास शेतीवर आणि आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल आणि आपलं नुकसान होईल याचा अंदाज त्याला आला होता.

मग यावर उपाय म्हणून इरविन याने महात्मा गांधींचा काटा काढायचा ठरवलं. त्याने महात्मा गांधी यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केलं आणि समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. हे सर्व तो नाटक करत असताना त्याने महात्मा गांधी यांच्यावर विषप्रयोग करण्याचे ठरवले. आपल्या घरातील स्वयंपाक्याला विष घातलेले दूध महात्माजींना द्यायला सांगितले. ही गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी स्वयंपाक्याला भरपूर पैसे दिले आणि धमकीही दिली. मात्र, दुधाचा पेला देताना त्या स्वयंपाक्याने महात्मा गांधींना सत्य सांगितले. यामुळे महात्मा गांधींचे प्राण वाचले. सत्य कथनामुळे महात्मा गांधीचे प्राण वाचले, तरी त्या स्वयंपाक्याला याची मोठी किंमत मोजावी लागली. त्याला कारागृहात डांबण्यात आलं. त्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं. त्याची जमीन जप्त करण्यात आली. त्याचं कुटुंब देशोधडीला लागलं. या स्वयंपाक्याचं नाव मियां अन्सारी असं होतं..

इतिहासात ही घटना नमूद करण्यात आली नसली, तरी सरकारी दस्तऐवजात याची नोंद आहे. मियां अन्सारीने फक्त एका व्यक्तीचा जीव वाचवला नव्हता तर त्याने आपल्या देशाच्या राष्ट्र पित्याचा जीव वाचवला होता.

Previous

गांधींच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचं स्वप्न पाहणारा तो महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तीन भेटींनी बदललं आयुष्य…

More Posts

Yashwantrao Holkar: भारताचा नेपोलियन बोनापार्ट… महाराजा यशवंतराव होळकर

Yashwantrao Holkar: भारताचा नेपोलियन बोनापार्ट… महाराजा यशवंतराव होळकर

Leave a Comment / इतिहास / By Team Lagav Batti
जेव्हा कुलगुरूंनी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलं”मी तुमच्यापेक्षा मोठा!”

जेव्हा कुलगुरूंनी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलं”मी तुमच्यापेक्षा मोठा!”

Leave a Comment / Uncategorized, इतिहास, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top