Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

महाराष्ट्र तापला! पुढील ४ दिवस धोक्याचे – उष्णतेच्या लाटेचा इशारा

By Team Lagav Batti / April 16, 2026

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. सध्या राज्यावर असलेल्या प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण भागात उष्ण आणि दमट हवामान तयार झालं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात नागरिकांना प्रचंड उकाडा आणि घामट वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. सांताक्रूझ येथे ३६ अंश तर कुलाबा येथे ३४.६ अंश तापमान नोंदलं गेलं. विशेष म्हणजे सकाळच्या वेळीसुद्धा आर्द्रता जास्त असल्याने लोकांना अस्वस्थता जाणवत आहे.

दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होताना दिसतेय. सोलापूरमध्ये तापमान ४३.२ अंशांवर पोहोचलं, तर पुण्यात ३९.९ अंशांची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४ आणि परभणीत ४२.१ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे.

विदर्भात तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमान नोंदलं गेलं आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्येही तापमान ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.

हवामान विभागानुसार, पुढील दोन ते चार दिवस कोकणात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. तर सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःला थंड ठेवा. कारण येणारे काही दिवस राज्यासाठी अक्षरशः ‘हिट वेव्ह’ टेस्ट ठरणार आहेत.

Previous

महाराष्ट्रात १७ विधानपरिषद जागांसाठी निवडणुकीचा बिगुल! एका समीकरणाने आमदारकीचा मार्ग मोकळा!

Next

‘चेस क्वीन’आर. वैशालीचा नवा विक्रम! भारताचं नाव उंचावलं…

Related Posts

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti
Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top