Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

‘चेस क्वीन’आर. वैशालीचा नवा विक्रम! भारताचं नाव उंचावलं…

By Team Lagav Batti / April 16, 2026

बुद्धिबळ विश्वात भारताचा झेंडा पुन्हा उंच फडकलाय. सध्या सुरु असलेल्या महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत आर वैशाली हिने विजय मिळवलाय आणि हा विजय मिळवणारी ती भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरलीय.. या स्पर्धेतला तिचा प्रवास अगदी नाट्यमय होता . सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ती बॉटमला होती, तिच्यासोबत दिव्या देशमुख आणि तान झोंगयी या खेळाडूंचीही कंडिशन सारखीच होती. पण इथून पुढे वैशालीने जो खेळ दाखवला, तो पूर्ण स्पर्धेचं चित्रच बदलून गेला. तिने संयम, अचूक चाल आणि मानसिक ताकद यांच्या जोरावर एक एक सामना जिंकत अव्वल स्थान गाठलं. तिचा हा कमबॅक इतका जबरदस्त होता की शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत तिने अशक्य वाटणारा विजय तिच्या नावावर केला. या विजयामुळे वैशालीने इतिहास रचलाय. गेल्या १५ वर्षांत जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. इतकंच नाही, तर भारताच्या बुद्धिबळ इतिहासात ही फक्त दुसरी वेळ आहे जेव्हा एखादी भारतीय महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पोहोचली आहे. तिच्याआधी कोनेरू हम्पी यांनी २०११ मध्ये हा पराक्रम केला होता. त्या नंतर आता वैशालीने ही परंपरा पुढे नेली आहे. या स्पर्धेतल तिचं


यश हे काही अचानक घडलेली गोष्ट नाही. दोन वर्षांपूर्वी टोरांटोत झालेल्या कॅन्डिडेट्स स्पर्धेतही तिचा प्रवास जवळपास असाच होता. सुरुवातीला सलग पराभवांमुळे ती मागे पडली होती, पण शेवटच्या टप्प्यात तिने सलग विजय मिळवत जबरदस्त कमबॅक केलं होतं. यामुळे तिच्या खेळातलं सातत्य, मानसिक ताकद आणि कठीण परिस्थितीत उभं राहण्याची क्षमता स्पष्ट दिसते. वैशालीसोबतच तिचा भाऊ आर प्रज्ञानानंद सुद्धा कॅन्डिडेट्स स्पर्धेत सहभागी झाला होता. एकाच कुटुंबातले दोन खेळाडू जागतिक पातळीवर अशा स्पर्धेत खेळत आहेत, ही भारतीय बुद्धिबळासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Previous

महाराष्ट्र तापला! पुढील ४ दिवस धोक्याचे – उष्णतेच्या लाटेचा इशारा

Next

लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचा निर्णय

Related Posts

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

Leave a Comment / क्रीडा / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top