Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

विधान परिषद निवडणूक : ११ जागांसाठी आज मतदान, २२ जूनला निकाल

By Team Lagav Batti / June 18, 2026

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ जागांवर चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीकडे केवळ स्थानिक राजकारण म्हणून नव्हे, तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय ताकदीची परीक्षा म्हणूनही पाहिले जात आहे. विशेषतः शिवसेना उबाठा पक्षातील काही नेत्यांच्या पक्षांतरानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा मतदानावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या सदस्यांना व्हिप जारी केला आहे. अधिकृत उमेदवाराशिवाय इतर कोणालाही मतदान केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवडणुकीत महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर-जालना यांसारख्या मतदारसंघांमध्ये थेट लढती होत आहेत.
दरम्यान, ठाणे, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांतील उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी जाहीर होणार असून, त्यातून आगामी राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे.

Previous

महाराष्ट्रावर महादुष्काळाचे सावट; फक्त ८५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, शेतीसाठी पाणीपुरवठा बंद

Next

CBSE चा मोठा निर्णय : नववी-दहावीसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य

Related Posts

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Leave a Comment / राजकारण / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top