Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

पुणेकरांनो, तुमच्या फोन मध्ये हे 5 अ‍ॅप्स आहेत का ?

By Team Lagav Batti / March 6, 2026

पुण्यात राहताय ? रोज बस, ट्रॅफिक, पालिका आणि मेट्रोशी झगडताय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. कारण हे 5 मोबाईल अ‍ॅप्स खरंच प्रत्येक पुणेकरासाठी लाईफ सेविंग ठरू शकतात.

पहिलं अ‍ॅप – आपली PMPML.


आधी बस कधी येईल, येईल की नाही, येऊन थांबेल की लगेच निघून जाईल… हा सगळा अंदाजच असायचा. पण आता नाही. या अ‍ॅपवर तुम्हाला लाईव्ह बस ट्रॅकिंग मिळतं, कोणत्या स्टॉपवर बस किती वेळात येणार आहे ते दिसतं, रूटची माहिती मिळते आणि खूप वेळ वाचतो. रोज बसने प्रवास करणाऱ्यांसाठी हे अ‍ॅप म्हणजे एकप्रकारचं ब्लेसिंगच आहे.

दुसरं अ‍ॅप – PMC CARE.


रस्त्यावर खड्डे, वॉटर लिकेज, कचऱ्याचे इश्यू , स्ट्रीटलाइट बंद पडणं, अशा तक्रारी करायला आधी पालिकेचे उंबरठे झिजवावे लागायचे. आता फक्त फोटो काढा, लोकेशन टाका आणि कम्पलेन सबमिट करा. तक्रारीचं स्टेटस सुद्धा ट्रॅक करता येतं. पुणेकरांचा आवाज थेट पालिकेपर्यंत पोहोचवणारं हे अ‍ॅप आहे.

तिसरं अ‍ॅप – रंग यात्रा.


पुणे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर. नाटक, संगीत, कविता, कला या सगळ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ. या साठी ‘रंग यात्रा’ अ‍ॅप कलाकारांना आणि रसिकांना एकत्र आणतं. इव्हेंट्सची माहिती, परफॉर्मन्सेस आणि कलाकारांसाठी हक्काचा डिजिटल मंच. सांस्कृतिक पुण्याचा डिजिटल अवतार म्हणजे रंग यात्रा अ‍ॅप.

चौथं अ‍ॅप – PTP Traffic Cop.


पुण्यात ट्रॅफिक म्हणजे रोजचा ताण. पण आता ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांना थेट सरळ करता येतं. फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा, लोकेशन द्या आणि तक्रार पोहोचते थेट ट्रॅफिक पोलिसांपर्यंत. सिग्नल तोडणारे, रॉंग साईड वाले, नियम मोडणारे यांची आता खैर नाही.

पाचवं आणि शेवटचं – Pune Metro App.


मेट्रोने प्रवास करताय? मग हे अ‍ॅप मस्ट आहे. तिकीट बुकिंग, रूट्स, ट्रेन टाईमिंग्स, स्टेशनची माहिती. सगळं काही एका क्लिकवर. लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही, कागदी तिकीटाची कटकट नाही. पुणे मेट्रोचा स्मार्ट अनुभव या अ‍ॅपमुळे अगदी परिपूर्ण होतो.

हे 5 अ‍ॅप्स फोनमध्ये असणं म्हणजे पुण्यात स्मार्टली जगणं.

Previous

मिका सिंगचा दिलदारपणा; भटक्या कुत्र्यांसाठी १० एकर जमीन दान

Next

अंधारात अभ्यास, 12 किमी चालत शाळा… आणि शेवटी IPS! शरण कांबळेंची प्रेरणादायी कथा

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top