Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

“भारताने अमेरिकेचा फायदा घेतला”; ट्रम्प यांचा आरोप, मोदींचं मात्र केलं कौतुक

By Team Lagav Batti / June 5, 2026

भारत-अमेरिका व्यापार करारावर ट्रम्प यांचा विश्वास; ‘मोदी माझे चांगले मित्र, पण भारताने वर्षानुवर्षे अमेरिकेवर जास्त टॅरिफ लादले’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत एकीकडे कौतुक तर दुसरीकडे गंभीर आरोप करत भारत-अमेरिका संबंध पुन्हा चर्चेत आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले “चांगले मित्र” असल्याचे सांगतानाच, भारताने अनेक वर्षे अमेरिकेचा फायदा घेतल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका लवकरच एका मोठ्या व्यापार करारावर स्वाक्षरी करू शकतात. मात्र, यापूर्वी भारताने अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ) लावल्यामुळे अमेरिकेला अपेक्षित लाभ मिळत नव्हता, असा दावा त्यांनी केला.

“भारताने अनेक वर्षे अमेरिकेचा फायदा घेतला. त्यांनी आमच्या उत्पादनांवर मोठे टॅरिफ लादले आणि बदल्यात फारसं काही दिलं नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे आणि अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवत आहे,” असे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे, भारतावर टीका करतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या पूर्वीच्या सरकारांनाही जबाबदार धरले. भारताने स्वतःच्या हिताचे निर्णय घेतले, पण अमेरिकेच्या आधीच्या नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अमेरिकेने भारतासह चीन, जपान, इस्रायल, पाकिस्तान, कॅनडा आणि युरोपियन युनियनमधील देशांच्या उत्पादनांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा प्रस्तावही मांडला आहे. त्यामुळे आगामी काळात भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि प्रस्तावित व्यापार कराराकडे जागतिक स्तरावर लक्ष लागले आहे.

Previous

अखेर प्रतीक्षा संपणार! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली 12 स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार…

Next

कुस्तीपटू ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार; कोण होते अनंतराव थोपटे?

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top