Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळायला बांगलादेशचा नकार, आयसीसीचा BCB ला कडक इशारा…

By Team Lagav Batti / January 24, 2026

फेब्रवारी मध्ये येणाऱ्या 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. बांगलादेश सरकारने भारतात येऊन टी-20 वर्ल्ड कप सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला असून, या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट संघाचे या स्पर्धेतील भवितव्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा नसून थेट बांगलादेश सरकारचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 2026 चा टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे सामने सुरक्षेच्या कारणासाठी श्रीलंकेत ठेवण्यात आले आहेत. पण, बांगलादेशने सुद्धा आपले सगळे सामने भारताबाहेर, विशेषतः श्रीलंकेत खेळवावेत अशी मागणी आयसीसीकडे केली होती. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी यावर चर्चा केली आणि 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्याची वेळ दिली होती. पण बांगलादेश सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून भारतात सामने खेळण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे.

या प्रकरणामागे अनेक घडामोडी कारणीभूत ठरल्याचं मानलं जातं. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला काढून टाकण्यात आल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. भारतात सोशल मीडियावर बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोहीम राबवली जात होती. या सगळ्या घटनांची दखल घेत बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्याचे आदेश दिले होते, आणि केकेआरने ते पाळले होते. यानंतरच बांगलादेशने भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळायला विरोध दाखवला.

आयसीसीने बांगलादेशच्या मागण्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या असून, सामने दुसऱ्या देशात हलवण्यास नकार दिला आहे. आयसीसी बोर्ड बैठकीत झालेल्या मतदानात बहुमताने असा निर्णय घेण्यात आला आहे की, जर बांगलादेशने भारतात येण्यास नकार कायम ठेवला, तर त्यांना स्पर्धेतून बाहेर काढलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

टी-20 विश्वचषकावर बहिष्कार टाकल्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डावर आर्थिक संकट ओढवू शकते. आयसीसीकडून मिळणारा सहभाग निधी गमवावा लागण्यासोबतच आर्थिक दंडाचीही शक्यता आहे. याशिवाय बीसीसीआयविरोधात भूमिका घेतल्याने भविष्यातील क्रिकेट संबंधांवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आता बांगलादेश उद्यापर्यंत आयसीसीला अंतिम निर्णय कळवणार असून, त्यावरच त्यांच्या विश्वचषकातील सहभागाचा निर्णय अवलंबून आहे.

Previous

अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच का? जाणून घ्या कारण आणि 2026 मधील अपेक्षित बदल

Next

मुंबई–नवी मुंबई मेट्रोलाइनला मंजुरी! 2 एअरपोर्ट जोडणारा हा गेमचेंजर प्रोजेक्ट

Related Posts

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

Leave a Comment / क्रीडा / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top