Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

‘पत्नीला अपमानास्पद शब्द बोलल्याने हुंडा छळाचा गुन्हा सिद्ध होत नाही.’ सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय?

By Team Lagav Batti / November 4, 2026

पत्नीला ‘बेवकूफ’ आणि ‘निकम्मा’ म्हणणं हे अपमानास्पद असू शकतं; मात्र फक्त अशा शब्दांच्या वापरावरून हुंड्यासाठी छळ किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पत्नीच्या आत्महत्येनंतर पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात दाखल करण्यात आलेला हुंडाबळी आणि क्रूरतेचा खटला रद्द केला आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करताना स्पष्ट केलं की, फक्त सर्वसाधारण आरोपांच्या आधारावर फौजदारी खटला पुढे चालवता येणार नाही. आरोपीने नेमका कोणता छळ केला आणि त्याचा महिलेच्या आत्महत्येशी काय संबंध होता, हे ठोसपणे दाखवणं आवश्यक आहे.

या प्रकरणात संबंधित जोडप्याचं लग्न जानेवारी २०२१ मध्ये झालं होतं. फेब्रुवारी २०२२ मध्ये ते कॅनडातील टोरोंटो इथे स्थायिक झाले. जून २०२३ मध्ये पत्नीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येच्या चिठ्ठीत शिक्षण आणि नोकरी मिळवताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख होता. मात्र, हुंड्याची मागणी किंवा पतीकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख नव्हता.

त्यानंतर पत्नीच्या वडिलांनी महाराष्ट्रात तक्रार दाखल करत पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी सोने आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. लग्नात दिलेल्या १५ तोळे सोन्याबाबतही न्यायालयाने स्पष्ट केलं की, ते प्रेमापोटी दिलेली भेट असू शकते. ते हुंड्याच्या मागणीमुळे दिलं होतं, याचा पुरावा आवश्यक आहे.

न्यायालयाने स्पष्ट केलं की, हुंडाबळीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मृत्यूपूर्वी हुंड्याच्या मागणीसंदर्भात छळ झाल्याचा ठोस संबंध दाखवावा लागतो. याच आधारावर सर्वोच्च न्यायालयाने पतीविरोधातील एफआयआर आणि संबंधित फौजदारी कारवाई रद्द केली.

Previous

दिवाळीच्या फराळाला महागाईचा फटका! खाद्यतेलांचे दर वाढले; शेंगदाणा तेल 211 रुपये किलोवर

Next

दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार? सर्वोच्च न्यायालयाकडून कायद्याच्या फेरविचाराचे संकेत…

More Posts

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

Leave a Comment / व्हायरल गोष्टी, सामाजिक / By Team Lagav Batti
हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

Leave a Comment / सामाजिक / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top