Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

रक्ताच्या नात्यातील विवाहांवर निर्बंध घालण्याचा अधिकार संसदेलाच; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

By Team Lagav Batti / November 20, 2026

रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; जनजागृतीसाठी केंद्राला निर्देश

नवी दिल्ली : रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी लग्न केल्यास त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर काही वाईट परिणाम होऊ शकतात, अशी चिंता सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. मात्र, अशा लग्नांवर बंदी घालण्याचा निर्णय न्यायालय घेऊ शकत नाही, तर त्यासाठी संसदेलाच कायदा करावा लागेल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. विवाह कोणाशी करायचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे न्यायालय कोणावरही लग्नासाठी बंधनं घालू शकत नाही, असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितलं. मात्र, लग्नाचा निर्णय घेताना त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यामागची वैज्ञानिक माहिती लोकांना माहीत असणं गरजेचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

विशेषतः ग्रामीण भागात रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने भविष्यात कोणत्या आरोग्यविषयक अडचणी निर्माण होऊ शकतात, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार्वी एस. यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

तसंच, अशा लग्नांमुळे होणाऱ्या संभाव्य आरोग्यविषयक परिणामांबाबत कायदा करता येईल का, किंवा देशभरात जनजागृती मोहीम राबवता येईल का, याचा विचार करण्यास केंद्र सरकारला सांगितलं आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातही या विषयाची माहिती देता येईल का, याचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

Previous

दादर नामांतरावर सरकारचा मोठा निर्णय; रेल्वे स्थानक नाही, मेट्रो स्टेशनचं होणार ‘चैत्यभूमी’ नामकरण

Next

Akwan Cyclone: अकवान चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशाला तडाखा; ताशी 90 किमी वेगाने वारे, 4 लाख नागरिकांचं स्थलांतर

More Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top