Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

LPG सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल; ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा

By Team Lagav Batti / September 7, 2026

ग्रामीण भागातील LPG ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ग्रामीण भागात दोन LPG सिलेंडर बुकिंगमधील 45 दिवसांची अट आता कमी करून 25 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण ग्राहकांनाही 25 दिवसांनंतर पुन्हा सिलेंडर बुक करता येणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 7 सप्टेंबर रोजी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्रमुखांना पत्र पाठवून ग्रामीण भागातील रिफील बुकिंगचा कालावधी 25 दिवस करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LPG पुरवठा सुधारल्याने निर्णय
अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर LPGच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मागणी आणि पुरवठ्यात समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 45 दिवसांची बुकिंग अट लागू करण्यात आली होती. मात्र, आता LPGचा पुरवठा वाढला असून रिफीलचा अनुशेषही कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने हा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एखाद्या ग्रामीण ग्राहकाने 1 तारखेला सिलेंडर बुक केला असेल, तर 26 तारखेपासून पुन्हा सिलेंडर बुक करता येणार आहे. म्हणजेच ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी बुकिंगचा कालावधी आता समान झाला आहे.

दरम्यान, LPGला पर्याय म्हणून केंद्र सरकारकडून PNG कनेक्शन वाढवण्यावरही भर दिला जात आहे. काही शहरांमध्ये PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांना LPG कनेक्शन सरेंडर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Previous

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी पावले; विद्यार्थी, तरुणांना दिलासा देणारे निर्णय

More Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top