Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!’ मिसिंग लिंकजवळ 50 फूट दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने वाचला जीव

By Team Lagav Batti / August 3, 2026

“‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात घडली. मिसिंग लिंक परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका 59 वर्षीय पर्यटकाची कार तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली. मात्र, कार मधल्या झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि पर्यटकाचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित भटनागर (वय 59) हे पर्यटनासाठी खालापूर परिसरात आले होते. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ते मिसिंग लिंक परिसरातील टेकडीवर कॅम्पिंगसाठी योग्य ठिकाण शोधत होते. यावेळी मिसिंग लिंक वरून पाहण्यासाठी त्यांनी टेकडीवरील कच्च्या रस्त्याने कार पुढे नेली. मात्र, कच्च्या रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार भरकटली आणि थेट दरीत कोसळली. सुदैवाने, सुमारे 50 फूट खाली असलेल्या झाडांमध्ये कार अडकल्याने ती आणखी खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. नाहीतर कार थेट मिसिंग लिंक मार्गावर कोसळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या जखमी पर्यटकाची सुटका केली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या बचाव कार्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या अपघातात मोहित भटनागर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

Previous

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू; राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 30 जुलैपासून अंमलात

Next

CWG 2026: दुखापतीमुळे मुख्य स्पर्धाच खेळता आली नाही… पण तेजस्विन शंकरने तरीही इतिहास रचला; डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय!!

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top