Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

इराण-अमेरिका पुन्हा आमनेसामने! शांतता करार फक्त दिखावा ?

By Team Lagav Batti / July 14, 2026

अवघ्या काही दिवसांपूर्वी शांततेचा करार आणि आता पुन्हा हल्ले. मग इराण आणि अमेरिका पुन्हा आमनेसामने का आले?
सुमारे चार महिन्यांच्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये १७ जून रोजी एक प्राथमिक शांतता करार झाला होता. त्यानुसार होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक, इराणला आर्थिक मदत आणि अणु कार्यक्रमावर चर्चा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली होती. पुढील ६० दिवसांत अंतिम करार होणार होता.


मात्र, ६ जुलैला इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील ८० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांना इशारे दिले आणि तणाव पुन्हा वाढला.
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण कोणाचं राहणार, यावरूनच मुख्य वाद सुरू झाला. इराणला या मार्गावर अधिक नियंत्रण हवं होतं, तर अमेरिका या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर कोणत्याही एका देशाचा ताबा असू नये, या भूमिकेवर ठाम आहे.


याशिवाय, इराणला मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतही नाराजी होती, तसेच अमेरिकेने इतर मध्यपूर्व देशांबरोबर केलेल्या हालचालींकडेही इराण संशयाने पाहत होता.
आता प्रश्न असा आहे की, युद्ध पुन्हा सुरू झालंय का? तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सध्या दोन्ही देश एकमेकांवर मर्यादित हल्ले करत आहेत. म्हणजे पूर्ण युद्ध सुरू झालेलं नाही. पण जर तणाव असाच वाढत राहिला, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
दुसरीकडे, पुन्हा चर्चेची शक्यताही पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढतो की दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या येतात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Previous

नेपाळ सीमेवर अमेरिकी नागरिक अटकेत; स्वतःला माजी US Navy अधिकारी असल्याचा दावा

Next

स्मार्टफोन, लॅपटॉप स्वस्त होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Related Posts

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Leave a Comment / राजकारण / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top