Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

वाळवंटातल्या एका विंचवाने बदलापूरच्या फोटोग्राफरला मिळवून दिला जागतिक सन्मान! 65 हजार फोटोंमधून फोटो ठरला विजेता

By Team Lagav Batti / October 23, 2026

वाइल्डलाइफ फोटोग्राफी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वाघ, सिंह, बिबट्या किंवा जंगलातील मोठमोठे प्राणी येतात. पण बदलापूरच्या एका फोटोग्राफरने चक्क वाळवंटातील छोट्याशा विंचवाचा असा काही फोटो काढलाय की, जगभरातील 65 हजारांहून अधिक फोटोंमधून त्याची विजेता म्हणून निवड झाली आहे! विशेष म्हणजे हा सन्मान जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या वाइल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेत मिळाला असून, बदलापूरचे सिताराम दिनकर राऊळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे.

जगप्रसिद्ध स्पर्धेत बदलापूरच्या फोटोग्राफरची बाजी!

वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर ही स्पर्धा जगभरातील वन्यजीव छायाचित्रकारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेला वाइल्डलाइफ फोटोग्राफीमधील ऑस्कर असंही म्हटलं जातं. यंदा जगभरातून आलेल्या 65 हजारांहून अधिक फोटोंमध्ये सिताराम राऊळ यांच्या फोटोने आपली वेगळी छाप पाडली. त्यांना अपृष्ठवंशीय प्राण्यांचं वर्तन म्हणजेच Behaviour: Invertebrates या कॅटेगरीमध्ये विजेतेपद मिळालं आहे.

एका विंचवाच्या फोटोमध्ये असं काय खास आहे?

राऊळ यांनी हा फोटो राजस्थानमधील जैसलमेरच्या वाळवंटात काढला आहे. या फोटोमध्ये एक विंचू स्वतःसाठी वाळूत खड्डा खोदताना दिसतोय. वाळवंटासारख्या कठीण वातावरणात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि जगण्यासाठी छोटे जीव कोणकोणत्या युक्त्या वापरतात, हे या एका फोटोमधून पाहायला मिळतं.

14 वर्षांची मेहनत आणि निसर्गाविषयीची आवड!

सिताराम राऊळ गेल्या 14 वर्षांपासून फोटोग्राफीच्या क्षेत्रात काम करत आहेत. वाइल्डलाइफ फोटोग्राफीसोबतच मॅक्रो आणि क्रिएटिव्ह नेचर फोटोग्राफीची त्यांना विशेष आवड आहे. राऊळ यांच्या मते, फोटोग्राफी म्हणजे केवळ समोर दिसणाऱ्या गोष्टीचा फोटो काढणं नाही, तर निसर्गातील सौंदर्य आणि त्यामागची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. या जागतिक यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आई-वडिलांना, कुटुंबाला, गुरूंना आणि बदलापूरमधील फोटोग्राफर मित्रांना दिलं आहे.

छोट्याशा जीवाने जगाचं लक्ष वेधलं!

या पुरस्कारानंतर राऊळ यांनी एक महत्त्वाची अपेक्षाही व्यक्त केली आहे. वन्यजीव संवर्धन म्हटलं की केवळ वाघ, सिंह आणि मोठ्या प्राण्यांचाच विचार न करता विंचू, कीटक आणि इतर लहान जीवांच्या संरक्षणाकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण निसर्गातील प्रत्येक जीवाचं स्वतःचं महत्त्व आहे आणि त्याचा अधिवास टिकून राहणंही तितकंच गरजेचं आहे. मोठा फोटो काढण्यासाठी तो क्षण ओळखणारी नजर असावी लागते, हेच सिताराम राऊळ यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आहे!

Previous

दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; टायगर श्रॉफ हल्ल्याचा दिला दाखला

Next

“मी आता बदललेय, एकदा कार्यक्रमाला येऊन बघा!” माधुरी दिक्षित समोर गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?

More Posts

एंटीबायोटिकचा गैरवापर धोकादायक; डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या सवयी

एंटीबायोटिकचा गैरवापर धोकादायक; डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या सवयी

Leave a Comment / व्हायरल गोष्टी / By Team Lagav Batti
MPSC मुख्य परीक्षेच्या तोंडावर निकालाचा खेळखंडोबा; 3 महीने उलटूनही निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी

MPSC मुख्य परीक्षेच्या तोंडावर निकालाचा खेळखंडोबा; 3 महीने उलटूनही निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी

Leave a Comment / व्हायरल गोष्टी / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top