Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

भारताने पाकिस्तानला हरवलं, पण पाकिस्तानच्या गळ्यातही पडलं पदक!

By Team Lagav Batti / October 3, 2026

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट फायनलमध्ये भारताचा 19 धावांनी विजय; भारताला सुवर्ण, पाकिस्तानला रौप्य तर श्रीलंकेला कांस्यपदक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल म्हटलं की सामन्यातील प्रत्येक क्षणाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष क्रिकेटच्या फायनलमध्येही असाच थरार पाहायला मिळाला. भारताने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरलं.

edit picture
भारताची दमदार फलंदाजी

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 28 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या डावात तब्बल 7 षटकार ठोकले. त्यानंतर तिलक वर्मानेही आक्रमक फलंदाजी करत 22 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 षटकारांचा समावेश होता. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 211 धावा केल्या.

पाकिस्तानसमोर 212 धावांचं आव्हान

भारताने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी अडचणीत आणलं. पाकिस्तानकडून हसन नवाजने ९६ धावांची शानदार खेळी करत सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न केला. सईम अयूबनेही 29 धावा केल्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी विकेट मिळवत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अखेर पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 192 धावांपर्यंतच पोहोचला.

भारताला सुवर्णपदक

पाकिस्तानला 19 धावांनी पराभूत करत भारताने फायनल जिंकली आणि सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटमध्ये भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे.

पण पाकिस्तानलाही मिळालं पदक

आता या सामन्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान फायनल हरलं असलं, तरी त्याला पदक मिळालं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या स्पर्धेत अव्वल तीन संघांना पदक दिलं जातं. त्यामुळे फायनल जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदक मिळालं, तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानला रौप्यपदक मिळालं. तर स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या श्रीलंकेला कांस्यपदक मिळालं. म्हणजेच भारत-पाकिस्तानच्या फायनलमध्ये भारताने बाजी मारत गोल्ड जिंकलं, पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला; पण तरीही पाकिस्तानच्या गळ्यात रौप्यपदक पडलं. अशा प्रकारे या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघांच्या खात्यात पदक जमा झालं.

Previous

महात्मा गांधींवर स्वयंपाक्याने विषप्रयोग केलेला पण…

Next

44 वर्षांची प्रतिक्षा संपली! भारताच्या महिला हॉकी संघाचं विजय;चीनला हरवत ऑलिम्पिकचं तिकीट

More Posts

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

Leave a Comment / क्रीडा / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top