Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

44 वर्षांची प्रतिक्षा संपली! भारताच्या महिला हॉकी संघाचं विजय;चीनला हरवत ऑलिम्पिकचं तिकीट

By Team Lagav Batti / October 3, 2026

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल 44 वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. चीनविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 1-0 असा विजय मिळवला. या सुवर्णपदकासोबतच भारतीय संघाने लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही मिळवली आहे. सामन्याची सुरुवात चीनच्या आक्रमक खेळाने झाली. चिनी खेळाडूंनी भारतावर दबाव निर्माण केला असला, तरी भारतीय बचावफळीने उत्तम कामगिरी करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. दरम्यान, सामन्याच्या 10व्या मिनिटाला भारताला मोठी संधी मिळाली. लालरेम्सियामीने शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

४४ वर्षानंतर भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले - महाराष्ट्र  दिनमान

लालरेम्सियामीसाठी हा सामना विशेष ठरला. तिचा हा 200वा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि याच सामन्यात तिने भारतासाठी निर्णायक गोल केला. भारताची आघाडी झाल्यानंतर चीनने सातत्याने हल्ले चढवले. सामन्यात चीनला पेनल्टी स्ट्रोकही मिळाला. मात्र अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाने अप्रतिम बचाव करत चीनला बरोबरी साधण्यापासून रोखलं. चीनला सामन्यात तब्बल पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय बचावफळीने एकही गोल होऊ दिला नाही.

सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत चीनने गोलकिपरला मैदानाबाहेर काढून अतिरिक्त खेळाडूसह भारतावर जोरदार आक्रमण केलं. मात्र भारतीय खेळाडूंनी शेवटपर्यंत संयम राखत चीनचा प्रत्येक प्रयत्न परतवून लावला. अखेर भारताने 1-0 असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारताने याआधी 1982 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर 1998 आणि 2018 मध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला, मात्र दोन्ही वेळा रौप्यपदक मिळालं. आता 44 वर्षांनंतर भारताने पुन्हा आशियाई खेळांचं सुवर्ण जिंकलं आहे. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाचं ऑलिम्पिकचं तिकीटही पक्कं झालं आहे.

Previous

भारताने पाकिस्तानला हरवलं, पण पाकिस्तानच्या गळ्यातही पडलं पदक!

Next

परतीचा पाऊस बरसणार; ऑक्टोबर हिटचा तडाखाही वाढणार, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

More Posts

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

Leave a Comment / क्रीडा / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top