Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

मनोज जरांगेंच्या ताफ्यात आली 1.90 कोटींची Defender; गाडीमागची कहाणी काय ?

By Team Lagav Batti / August 11, 2026

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सभांमधील त्यांची वक्तव्यं आणि सत्ताधारी नेत्यांवरील टीका यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, त्यांच्या दौऱ्यातील आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील प्रवास करत असलेली पांढऱ्या रंगाची नवी कोरी Defender. ही गाडी नेमकी कुणाची? जरांगेंकडे एवढी महागडी गाडी आली कुठून? आणि त्यांनी स्वतः याबाबत काय सांगितलं? या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत.

Defender जरांगेंची नाही, मग कुणाची?

मनोज जरांगे पाटील वापरत असलेली Defender ही सांगोला तालुक्यातील चिखमहुद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी दिल्याचं समोर आलं आहे. भोसले कुटुंबाचा सराफाचा व्यवसाय असून शेतीही आधुनिक पद्धतीने केली जाते. जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील भूमिकेबद्दल आपल्याला आदर असल्याचं भोसले यांनी सांगितलं. मात्र, गाडी देण्यामागे त्यांचं कारण वेगळं आहे.

जरांगेंचा प्रवास कमी त्रासदायक व्हावा म्हणून गाडी

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनांदरम्यान मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलं. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं भोसले यांचं म्हणणं आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जरांगे येणार असल्याचं समजल्यानंतर आपण Defender घेतली आणि या गाडीत सर्वात आधी मनोज जरांगे यांनी बसावं, अशी इच्छा होती, असं त्यांनी सांगितलं. पंढरपूरमधील सरकोली येथील सभेनंतर त्यांनी ही गाडी जरांगेंना वापरण्यासाठी दिली. गाडीमधील सुविधा आणि आरामदायी प्रवासामुळे जरांगेंना दौऱ्यातील शारीरिक त्रास कमी व्हावा, हा आपला उद्देश असल्याचं भोसले यांनी स्पष्ट केलं.

“नवीन गाडीत देव बसावा…”

गाडी देण्यामागच्या भावनेबद्दल बोलताना सुभाष भोसले यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. “नवीन गाडीत देव बसावा, अशी इच्छा होती. आमच्या समाजासाठी मनोज जरांगे हे देवच आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जरांगे यांनी सुरुवातीला या आलिशान गाडीत बसण्यास नकार दिला होता. मात्र, भोसले यांच्या आग्रहानंतर त्यांनी ती गाडी वापरण्यास सुरुवात केली.

Defenderची किंमत किती?

भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या Defenderची किंमत तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे ही गाडी खरेदी करण्यासाठी त्यांनी सुमारे 1.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच, एका आंदोलनकर्त्याचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून एका समर्थकाने तब्बल कोट्यवधी रुपयांची गाडी उपलब्ध करून दिल्याची ही घटना चर्चेत आली आहे.

मग जरांगेंचं काय म्हणणं आहे?

दरम्यान, Defenderच्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनीही या गाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही गाडी आपली नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. एका समाजबांधवाने आपल्याला ही गाडी वापरण्यासाठी दिली असल्याचं जरांगे म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने “देवाने मला भरपूर दिलं आहे, तुम्ही माझ्या गाडीत बसा,” असं सांगितलं. त्यानंतर आपण त्या गाडीतून दौरा करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जरांगे यांनी आणखी एक मुद्दा मांडला मराठा समाजातील अनेक लोक आपुलकीने आपल्या गाडीत बसवतात, त्यामुळे कोणाची गाडी आहे याचा विचार न करता आपण समाजबांधवांच्या आग्रहाचा स्वीकार करतो.

“गाडीच्या काचा फुटल्या आहेत…”

दरम्यान, दौऱ्यात या Defenderभोवती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असल्याचंही जरांगे यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा 50-50 मुलं गाडीला लटकतात आणि त्यामुळे गाडीच्या काचांचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे 1.90 कोटींची Defender असली तरी तिचा वापर राजेशाही प्रवासासाठी नाही, तर आंदोलनाच्या दौऱ्यातील प्रवासासाठी होत असल्याचा जरांगेंचा दावा आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय संघर्ष सुरू असताना दुसरीकडे जरांगेंच्या ताफ्यात दिसणाऱ्या या महागड्या गाडीची चर्चा आता वेगळ्याच कारणाने रंगली आहे. गाडी कुणाची, किंमत किती आणि ती जरांगेंकडे कशी आली, यापेक्षा ती देण्यामागची भावना काय होती, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

Previous

औरंगाबाद, धाराशिव, अहिल्यानगरनंतर आता बुलढाण्याचंही नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत मागणी!

Next

FSSAI School Food Guidelines : समोसा, चिप्स, कोल्ड्रिंकला आता लगाम? शाळांच्या कॅन्टीनसाठी FSSAIचा नवा फॉर्म्युला

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top