Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

महाराष्ट्रात FDA ची धडक मोहीम! 102 जण अटकेत, 1.58 कोटींचा गुटखा आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

By Team Lagav Batti / June 4, 2026

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी राज्यव्यापी कारवाई केली आहे. 25 मे ते 31 मे 2026 या कालावधीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 103 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान 102 आरोपींना अटक करण्यात आली असून 86 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात विशेष तपास मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. FDA ने भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करून 102 आरोपींना अटक केली. या कारवाईत 34 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेत कोकण विभाग आघाडीवर राहिला. येथे 47 आस्थापनांवर छापे टाकून 46 जणांना अटक करण्यात आली. तर मुंबई विभागात 22 कारवाया करून 23 आरोपींना अटक करण्यात आली.महाराष्ट्रात FDA ची धडक मोहीम!

गुटख्याविरोधातील कारवाईसोबतच FDA ने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवरही धडक कारवाई केली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 73 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत आंबे, खवा, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, तूप, मसाले, आईस्क्रीम, कुल्फी, बेकरी पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांचा 1.24 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा तब्बल 90,639 किलो साठा जप्त करण्यात आला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये; हेल्पलाइन सुरू, विशेष कक्षही स्थापन होणार…

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top