Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

तुकाराम मुंढे ‘अॅक्शन मोड’ मध्ये, अवघ्या 3 दिवसांत 53 धाडी, 33 जणांना अटक, राज्यभर FDA ची धडक मोहीम…

By Team Lagav Batti / May 29, 2026

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ‘अॅक्शन मोड’मध्ये दिसून आले आहेत. आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कामकाजासाठी ओळखले जाणारे मुंढे यांनी 25 मे रोजी FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि अवघ्या तीन दिवसांत राज्यभर विशेष धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांविरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने धाडी आणि जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत राज्यभरातील 53 आस्थापनांवर छापे टाकले. यापैकी 34 ठिकाणी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री सुरू असल्याचे आढळले. या प्रकरणी 25 एफआयआर दाखल करण्यात आले असून 33 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 वाहने जप्त करण्यात आली असून 27 आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.
या मोहिमेत मुंबई विभागात सर्वात मोठी कारवाई झाली. बृहन्मुंबईत 19 आस्थापनांची झाडाझडती घेऊन सर्व आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण 20 लाख 57 हजार 296 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन, आईसक्रीम आणि बेकरी पदार्थांसह 23 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 28 लाख 78 हजार 572 रुपयांचे संशयास्पद आणि नियमबाह्य खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी सुरू असून पुढील कारवाईचा निर्णय अहवालानंतर घेतला जाणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर FDAची ही पहिली मोठी कारवाई मानली जात असून राज्यभरातील भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्या आस्थापनांना यामुळे स्पष्ट इशारा मिळाल्याचं बोललं जात आहे.

Previous

मुंबई-पुण्याचा AQI दिल्लीलाही मागे टाकतोय? महाराष्ट्राच्या हवेबाबत वाढली चिंता

Next

आता ‘तारीख पे तारीख’ नाही? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश; राखीव निकाल ३ महिन्यांत देणं बंधनकारक

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top