Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

विजया मेहता यांचं निधन; मराठी रंगभूमीच्या ‘बाईं’चा प्रेरणादायी प्रवास…

By Team Lagav Batti / July 1, 2026

मराठी रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक विजया मेहता यांचं 30 जून 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. ‘बाई’ म्हणून संपूर्ण नाट्यविश्वात ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी केवळ नाटकं दिग्दर्शित केली नाहीत, तर अनेक दिग्गज कलाकार घडवले. 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा येथे जन्मलेल्या विजया जयवंत यांचा रंगभूमीवरील प्रवास भारतीय विद्या भवन आणि मुंबई मराठी साहित्य संघातून सुरू झाला. इब्राहिम अल्काझी, अदी मर्झबान आणि दुर्गाबाई खोटे यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांनी नाट्यशिक्षण घेतलं. 1960 मध्ये विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना करून मराठी प्रायोगिक रंगभूमीची नवी चळवळ उभी केली.

त्यांच्या दिग्दर्शनातून ‘मला उत्तर हवंय’, ‘जास्वंदी’, ‘अखेरचा सवाल’, ‘हमीदाबाईची कोठी’ यांसारखी गाजलेली नाटकं रंगमंचावर आली. ‘रावसाहेब’, ‘पेस्तनजी’ आणि ‘स्मृतिचित्रे’ यांसारख्या चित्रपट व टेलिफिल्म्सचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. अभिनेत्री म्हणून ‘पार्टी’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले. “दिग्दर्शकाने कलाकाराला घडवावं, पण त्याच्यावर नियंत्रण ठेवू नये,” हा त्यांचा दृष्टिकोन कायम राहिला.

विजया मेहता यांच्या कार्याचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी झाला. 1975 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्यानंतर पद्मश्री, स्मृतिचित्रेला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, पेस्तनजीला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘रावसाहेब’ साठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांचं ‘झिम्मा’ हे आत्मचरित्रही विशेष गाजलं. रंगभूमीला आयुष्य वाहिलेल्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने मराठी नाट्यविश्वातील एक युग संपलं आहे.

Previous

मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज संपली? WhatsApp चं Username फीचर आलं; असं करा Username Reserve!

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top