Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

BUDGET 2026: काय स्वस्त, काय महाग…

By Team Lagav Batti / February 1, 2026

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण य़ांनी आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं, याची यादी पाहा
काय स्वस्त ?

मोटारसायकल
पादत्राणे, बूट
कॅन्सरची औषधं
मधुमेहाची औषधं
क्रीडा साहित्य
मोबाईल फोन
टॅबलेट
एलसीडी, एलईडी
मायक्रो ओव्हन
ईव्ही बॅटरी, ईव्ही वाहने
लिथियम आयन बॅटरी
सौर पॅनेल
भारतात बनवलेले कपडे
वैद्यकीय उपकरणे
फ्रोझन मासे
अपघात विमा

आता याच 2026-27 च्या अर्थसंकल्पातून काय महाग झालं, तेही पाहा…

काय महाग ?

इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले
खनिज
दारु
पीव्हीसी फ्लेक्स शीट्स
या अर्थसंकल्पाच्या स्वस्त महाग गोष्टीं पाहिल्यास लक्षात येईल की, आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून तुमचं व्यसन महागलंय..म्हणजेच सिगारेट आणि तंबाखू प्रोडक्ट महाग झाली आहेत. सिगारेट 40% पर्यंत महाग होतील. कारण सिगरेट, गुटखा, जर्दा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर टॅक्स वाढवण्यात आला आहे पान मसाला, खैनी आणि गुटखा यांसारख्या तंबाखू उत्पादनांवर 40% GST लागेल. उपकर (सेस) काढून टाकण्यात आला आहे. आतापर्यंत यावर 28% GST सह ‘भरपाई उपकर’ (कंपनसेशन सेस) लागत होता. यामुळे एकूण कर 50% पेक्षा जास्त होत होता. सिगारेटवर तिच्या लांबीनुसार नवीन उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) देखील लागू होईल. ₹2.05 पासून ते ₹8.5 प्रति स्टिकपर्यंत हे उत्पादन शुल्क लागेल. याव्यतिरिक्त, तंबाखू उत्पादनांप्रमाणे सिगारेटवर 40% GST देखील लागेल. तथापि, बिडीला दिलासा देत GST 18% करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) उत्पादन खर्चात समाविष्ट होते. जेव्हा सिगारेट कारखान्यातून बाहेर पडते, तेव्हा त्यावर उत्पादन शुल्क लागलेले असते. यानंतर जेव्हा त्यावर GST लावला जातो, तेव्हा तो ‘वाढलेल्या किमतीवर’ (ज्यात उत्पादन शुल्क समाविष्ट आहे) लागतो. यामुळे ‘करावर कर’ अशी स्थिती निर्माण होते आणि अंतिम MRP वाढते. या बदलामुळे किरकोळ बाजारात सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांच्या किमतीत 15% ते 40% पर्यंत वाढ होऊ शकते. सरकारचे हे पाऊल सरकारी तिजोरी भरण्याचा एक प्रयत्न मानला जात आहे. कारण सप्टेंबरमध्ये सरकारने घरगुती वापर वाढवण्यासाठी अनेक उत्पादनांवर जीएसटीमध्ये कपात केली होती.

Previous

BUDGET 2026: करदात्यांना काय फायदा?

Next

बजेट 2026: शाळेत आता ‘लाईक, शेअर आणि सबस्क्राईब’चे धडे; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

Related Posts

Copper Investment 2025: तांब्याचे दर का वाढणार? तज्ज्ञांचा मोठा अंदाज

Copper Investment 2025: तांब्याचे दर का वाढणार? तज्ज्ञांचा मोठा अंदाज

Leave a Comment / मनीमॅटर / By Team Lagav Batti
Digital: सावध रहा! डिजिटल अरेस्टचा फास वाढतोय | Lagavbatti

Digital: सावध रहा! डिजिटल अरेस्टचा फास वाढतोय | Lagavbatti

Leave a Comment / मनीमॅटर / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top