आयपीएल 2027 आधी मुंबई इंडियन्ससमोर कॅप्टन्सीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या सीझनमध्ये टीमची कमान सांभाळणारा हार्दिक पांड्या ट्रेड होऊन पंजाब किंग्समध्ये गेला आहे. त्याच्या जागी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह मुंबईच्या टीममध्ये आला आहे. हार्दिकच्या जाण्यानंतर आता मुंबईचा नवा कॅप्टन कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

हार्दिकने याआधी मुंबई इंडियन्सचे पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारे कॅप्टन रोहित शर्मा यांची जागा घेतली होती. मात्र, आता हार्दिक टीममधून बाहेर पडल्यामुळे रोहित पुन्हा कॅप्टन होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 16 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका खेळाडूच्या हातात कॅप दिसत आहे. त्यामुळे अनेक फॅन्स हा फोटो रोहित शर्माशी जोडत असून, त्याला पुन्हा कॅप्टन्सी मिळण्याचा हा संकेत असू शकतो, असा अंदाज लावत आहेत.
रोहितकडे कॅप्टन्सीचा मोठा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने अनेक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, फ्रेंचायजीने अद्याप नव्या कॅप्टनच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील फोटो हा फक्त एक हिंट आहे की त्यामागे काही वेगळं आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

तिलक वर्माही कॅप्टन्सीचा पर्याय
रोहितशिवाय तिलक वर्माचं नावही कॅप्टन्सीसाठी चर्चेत आहे. तिलक हा युवा खेळाडू असून त्याला टीम इंडियासाठी खेळण्याचा अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही कॅप्टन्सी केली आहे. त्यामुळे मुंबई त्याच्याकडेही भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहू शकते.

दरम्यान, मुंबई इंडियन्सकडे मिनी ऑक्शनसाठी 32.60 कोटी रुपयांचा पर्स असून टीमचे 9 स्लॉट्स रिकामे आहेत. यामध्ये 2 विदेशी खेळाडूंच्या जागा आहेत. आता ऑक्शनमध्ये कोणते खेळाडू मुंबईच्या टीममध्ये येतात आणि कॅप्टन्सीची जबाबदारी कोणाकडे जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

