Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

Ayodhya-Janakpur Express: अयोध्येहून थेट जनकपूरला रेल्वे; 604 किमीचा प्रवास 18 तासांत, 28 नोव्हेंबरपासून सेवा सुरू

By Team Lagav Batti / November 23, 2026

अयोध्या आणि जनकपूर या दोन धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणारी थेट रेल्वे सेवा सुरू होणार आहे. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या आणि माता सीतेची जन्मभूमी मानल्या जाणाऱ्या नेपाळमधील जनकपूर धामदरम्यान धावणाऱ्या सरयू-कमला एक्सप्रेसचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं आहे. भारत आणि नेपाळमधील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंधांना जोडणाऱ्या या रेल्वे सेवेला 28 नोव्हेंबरपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरुवात होणार आहे.

अयोध्या कँट ते जनकपूर धाम असा या रेल्वेचा प्रवास तब्बल 604 किलोमीटरचा असेल. हे अंतर पूर्ण करण्यासाठी ट्रेनला सुमारे 18 तास लागणार आहेत. या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना वाटेत ट्रेन बदलण्याची गरज भासणार नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील महत्त्वाच्या स्थानकांवरून ही गाडी पुढे जाईल आणि भारतातील जयनगरनंतर नेपाळमध्ये प्रवेश करून जनकपूर धामपर्यंत पोहोचेल.

या मार्गावर अयोध्या धाम, मनकापूर, बस्ती, गोरखपूर, नरकटियागंज, रक्सौल, सीतामढी, शीशो, मधुबनी आणि जयनगर ही प्रमुख स्थानकं असतील. त्यानंतर ही रेल्वे भारत-नेपाळ सीमा ओलांडून जनकपूर धामला पोहोचणार आहे. त्यामुळे अयोध्या आणि जनकपूर या दोन्ही धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी हा प्रवास अधिक सोयीचा ठरणार आहे.

‘सरयू-कमला एक्सप्रेस’ आठवड्यातून एकदा धावणार आहे. गाडी क्रमांक 15596 अयोध्या कँटहून प्रत्येक सोमवारी सायंकाळी 5.50 वाजता सुटेल. मार्गातील प्रमुख स्थानकांवरून प्रवास करत ही गाडी मंगळवारी नेपाळी वेळेनुसार दुपारी 12.40 वाजता जनकपूर धाम येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 15595 प्रत्येक शनिवारी नेपाळी वेळेनुसार दुपारी 1.10 वाजता जनकपूर धामहून रवाना होईल आणि रविवारी सकाळी 8.10 वाजता अयोध्या कँट येथे पोहोचेल.

ही एक्सप्रेस 17 कोचच्या आधुनिक LHB रेकसह धावणार आहे. यात 2AC चे 2 कोच, 3AC चे 3 कोच, 3E चे 3 कोच आणि स्लीपर श्रेणीचे 7 कोच असतील. याशिवाय LSLRD आणि वीज निर्मितीसाठी LWLRRM कोचचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 2AC मध्ये प्रत्येकी 52, 3AC मध्ये 72, 3E मध्ये 80 आणि स्लीपरमध्ये प्रत्येकी 80 बर्थची क्षमता असेल.

मात्र, या नव्या रेल्वे सेवेचं तिकीट किती रुपयांना मिळणार, याबाबत सध्या रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी प्रवाशांना अधिकृत दरांची माहिती मिळणार आहे. 28 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्यानंतर अयोध्या ते जनकपूरचा हा थेट रेल्वे प्रवास भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Previous

मोदींकडून नेपाळला 15 हजार कोटींची मदत; बालेन शाह यांच्या भारत दौऱ्यात 8 करार, अयोध्या-जनकपूर रेल्वे सेवेलाही सुरुवात

More Posts

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

Leave a Comment / व्हायरल गोष्टी, सामाजिक / By Team Lagav Batti
हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

Leave a Comment / सामाजिक / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top