Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

‘मुली फक्त पैशांवर प्रेम…’; इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य चर्चेत, ‘Love Is A Money’ म्हणत प्रेमाची सांगितली व्याख्या

By Team Lagav Batti / November 17, 2026

प्रेम म्हणजे नेमकं काय, यावरून अनेकदा वेगवेगळी मतं मांडली जातात. मात्र, प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी प्रेमाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ‘मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात’, असं विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं. एवढंच नाही, तर ‘Love Is A Money’ अशी प्रेमाची व्याख्याही त्यांनी सांगितली. भाईंदरमधील दिवाळी वंडरलँड कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातील विनोदी शैली आणि वेगवेगळ्या विषयांवरील परखड विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्तव्यांवर यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. आता मुली आणि प्रेम याबाबत त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

मुलींच्या प्रेमाबाबत नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवाळीनिमित्त दिवाळी वंडरलँड कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना इंदुरीकर महाराजांनी प्रेमाच्या विषयावर भाष्य केलं. एक मुलगी माझ्यावर प्रेम करते, असं म्हणणारा तरुण माझ्याकडे आला. तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत, त्या काढून ये, असं मी त्याला सांगितलं. मुलगी कधीच मुलावर प्रेम करत नाही, ती पैशांवर प्रेम करते. खरं आहे की खोटं आहे? तुम्हा तिघांना आलेला अनुभव आहे. याला तर मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिला आहे, असं म्हणत त्यांनी एका तरुणाकडे इशाराही केला.

पुढे प्रेमाविषयी बोलताना त्यांनी, ‘प्रेम वगैरे काही नसतं. Love Is A Money आणि Money Is A Love. Money Is A Life आणि Life Is A Money, असं म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये चर्चा रंगली असून, मुलींच्या प्रेमाबाबत केलेल्या टिप्पणीवरून नव्या वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाईलबाबतही दिला सल्ला

याच कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी मोबाईलच्या वाढत्या वापराबाबतही भाष्य केलं. मोबाईलमुळे लोक वेडी झाली आहेत, असं म्हणत त्यांनी नागरिकांना मोबाईलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिला. मोबाईल ही चांगली वस्तू असली, तरी तो सतत उघडून वापरू नका, असंही ते म्हणाले.

सरकारी मदतीचं केलं कौतुक; शाळांच्या प्रश्नाकडेही वेधलं लक्ष

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचाही उल्लेख केला. सरकारने दिलेल्या पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या दोन हजार रुपयांमुळे यंदा सर्वांची दिवाळी मोठी झाली, असं म्हणत त्यांनी या मदतीचं कौतुक केलं. याशिवाय जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळा टिकल्या पाहिजेत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या शाळा बंद झाल्या, तर सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, असं म्हणत त्यांनी सरकारी शाळांचं महत्त्व अधोरेखित केलं. प्रेम, मोबाईलचा वापर, सरकारी मदत आणि शिक्षण अशा विविध विषयांवर इंदुरीकर महाराजांनी या कार्यक्रमात भाष्य केलं. मात्र, मुलींच्या प्रेमाबाबत केलेलं त्यांचं विधान सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे.

Previous

ऊसदरावरून सोलापुरात शेतकरी आक्रमक; 3500 रुपये पहिल्या उचलीची मागणी, राजू शेट्टींचा महामार्ग आणि रेल्वे रोकोचा इशारा

More Posts

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

Leave a Comment / व्हायरल गोष्टी, सामाजिक / By Team Lagav Batti
हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

Leave a Comment / सामाजिक / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top