Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

अजितदादांच्या अपघाताबाबत फडणवीसांची अमित शाहांसमोर मोठी मागणी.. काय म्हणाले..?

By Team Lagav Batti / November 16, 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणाचा तपास लवकर पूर्ण करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. या अपघातात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्हा परिषद परिसरात अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं

अपघात की घातपात? तपास अहवालाकडे लक्ष

अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही तपासातील विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, या घटनेला आठ ते दहा महिने उलटले असून विविध तपास यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने चौकशी सुरू आहे. मात्र, सामान्य नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होणं आवश्यक आहे. यासाठी आपण स्वतः अमित शाह यांना तपासाचा अहवाल लवकरात लवकर मिळावा, अशी विनंती केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा अपघात असेल, तर त्यामागची कारणंही स्पष्टपणे समोर आली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. अमित शाह यांनीही तपास अहवाल लवकर आणण्यासाठी लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अजितदादांच्या कामाच्या शिस्तीची आठवण

या कार्यक्रमात फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचाही उल्लेख केला. दादा पहाटे सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करायचे, असं सांगत त्यांनी अजितदादांच्या कामाच्या झपाट्याचं कौतुक केलं. वरून कणखर वाटणारे अजित पवार मनाने प्रेमळ होते. त्यांच्याकडे कामाबाबत स्पष्ट भूमिका होती. एखादी गोष्ट पटली तर होकार आणि पटली नाही तर थेट नकार देण्याची त्यांची पद्धत होती, असंही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्याच्या विकासात अजित पवार यांचं योगदान मोठं असल्याचं सांगताना, पुण्याच्या प्रगतीचा इतिहास त्यांच्या कामाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं फडणवीस यांनी नमूद केलं. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही त्यांच्या नेतृत्वाची उणीव जाणवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अंतिम तपास अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय, याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर येण्यासाठी आता तपास अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

Previous

राजस्थान रेल्वे स्फोट: प्रेमसंबंध, पैशांचं आमिष अन् पाकिस्तान कनेक्शन; महकदीप कौर कोण?

More Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top