Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

पुण्यात 14 दिवस जमावबंदी; 5 पेक्षा जास्त जणांच्या गर्दीसाठी परवानगी बंधनकारक, भडकाऊ सोशल मीडिया पोस्टवरही नजर

By Team Lagav Batti / August 17, 2026
पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी लागू ; पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर  पोलिसांचा निर्णय

पुणे शहरात येणारे सण, सामाजिक कार्यक्रम आणि संभाव्य आंदोलने लक्षात घेऊन पोलिसांनी 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी काही कृतींवर निर्बंध घातले आहेत. हा आदेश महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 37 (1), (2) आणि (3) अंतर्गत जारी करण्यात आला आहे. 18 ऑगस्टच्या रात्री 12.01 वाजल्यापासून 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत तो लागू राहणार आहे.

5 किंवा त्यापेक्षा जास्त जणांची गर्दी? आधी परवानगी घ्या
या काळात सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा मेळावा, रॅली किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेता अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

  • शस्त्रं आणि धोकादायक वस्तूंवर बंदी
  • प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी खालील वस्तू बाळगण्यास मनाई असेल—
    शस्त्रे
  • दगड किंवा इजा होऊ शकणाऱ्या वस्तू
  • स्फोटक पदार्थ
  • ज्वलनशील आणि ज्वालाग्राही पदार्थ
  • इतरांना शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू
    मात्र, कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

पुतळे, पोस्टर जाळणे किंवा भडकाऊ घोषणा देण्यासही मनाई
सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्ती, नेता किंवा संस्थेचे चित्र, प्रतीकात्मक पुतळा किंवा मूर्ती दाखवणे किंवा जाळणे यावरही निर्बंध आहेत. याशिवाय अश्लील, आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर घोषणा, गाणी किंवा संगीताच्या माध्यमातून सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या कृतींवरही कारवाई केली जाऊ शकते.

सोशल मीडियावरही पोलिसांची नजर
या आदेशात सोशल मीडिया आणि डिजिटल कंटेंटचाही समावेश करण्यात आला आहे. गुन्हेगारांचे व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करणे, लोकांमध्ये भीती निर्माण करणारी सामग्री शेअर करणे, धमक्या देणे किंवा कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होईल अशी भडकाऊ डिजिटल सामग्री प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हणजेच केवळ रस्त्यावरील गर्दी किंवा आंदोलनांवरच नाही, तर सोशल मीडियावरील चिथावणीखोर कंटेंटवरही पोलिसांची नजर राहणार आहे.

सणांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन यांसारखे सण आणि विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रम या काळात होणार आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, निदर्शने, बंद किंवा आंदोलनं होण्याची शक्यता असते. अतिक्रमणविरोधी कारवाई किंवा संवेदनशील मुद्द्यांमुळेही काही ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकांना काठी बाळगण्याची परवानगी
खासगी सुरक्षा रक्षक आणि पहारेकरी यांना कर्तव्य बजावताना साडेतीन फुटांपर्यंतची काठी बाळगता येणार आहे. मात्र, इतर नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणी शस्त्र किंवा इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यावर निर्बंध कायम राहतील.

नियम मोडल्यास काय होणार?
या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 135 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
महत्त्वाचं म्हणजे 31 ऑगस्टला आदेशाची मुदत संपली तरी त्याआधी झालेल्या उल्लंघनासंदर्भातील तपास, जप्ती, दंड किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू राहू शकते. त्यामुळे पुणेकरांनी या 14 दिवसांच्या कालावधीत मोर्चा, मिरवणूक, गर्दीचा कार्यक्रम किंवा सोशल मीडियावर संवेदनशील कंटेंट शेअर करण्यापूर्वी पोलिसांच्या नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे.

Previous

PM Modi Speech: लाल किल्ल्यावरून मोदींचा आत्मनिर्भर भारताचा रोडमॅप; AI ते विकसित भारत, भाषणातील 10 मोठे मुद्दे

Next

तुकाराम मुंढेंचा फोटो आता घराघरात लागणार! मुक्ताईनगरच्या ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय

More Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top