Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

ISRO Recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी इस्रोमध्ये नोकरीची संधी; 93 पदांसाठी भरती

By Team Lagav Batti / August 12, 2026

इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO मध्ये वैज्ञानिक-अभियंता म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ISRO च्या केंद्रीकृत भरती मंडळामार्फत वैज्ञानिक-अभियंता ‘SC’ पदांच्या एकूण 93 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्ससह विविध अभियांत्रिकी शाखांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड GATE 2025 किंवा GATE 2026 च्या वैध गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

कोणत्या शाखांसाठी किती जागा?
ISRO च्या या भरतीमध्ये एकूण 93 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 35 जागा इलेक्ट्रॉनिक्स शाखेसाठी आहेत. त्यानंतर मेकॅनिकलच्या 26 आणि कॉम्प्युटर सायन्सच्या 13 जागा आहेत.

शाखानिहाय पदसंख्या अशी आहे:

इलेक्ट्रॉनिक्स – 35

मेकॅनिकल – 26

कॉम्प्युटर सायन्स – 13

सिव्हिल – 10

इलेक्ट्रिकल – 4

रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – 2

आर्किटेक्चर – 2

सिव्हिल, PRL ऑटोनॉमस बॉडी – 1

ISRO च्या कोणत्या केंद्रांवर मिळू शकते पोस्टिंग?


निवड झाल्यानंतर उमेदवारांना ISRO च्या विविध केंद्रांवर नियुक्ती मिळू शकते. यामध्ये बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा, महेंद्रगिरी, हसन आणि वलियामाला या ठिकाणांचा समावेश आहे.

कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?


या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेतील BE किंवा BTech पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित शाखेतील GATE 2025 किंवा GATE 2026 चा वैध स्कोअर असणे गरजेचे आहे.

GATE स्कोअरवरून मुलाखतीसाठी निवड


ISRO च्या भरती प्रक्रियेत GATE स्कोअरला महत्त्व देण्यात आले आहे. उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड त्यांच्या GATE गुणांच्या आधारे केली जाईल. त्यानंतर मुलाखतीमध्ये उमेदवाराचे तांत्रिक ज्ञान, विषयाची समज, संवादकौशल्य आणि शैक्षणिक कामगिरी तपासली जाईल. अंतिम निवड करताना GATE गुण आणि मुलाखतीला प्रत्येकी 50 टक्के महत्त्व दिले जाणार आहे. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अंतिम निवडीसाठी किमान 60 टक्के एकूण गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत लागू असेल.

17 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज


ISRO च्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 17 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदत संपण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ISRO च्या अधिकृत भरती अधिसूचनेत दिलेली शैक्षणिक पात्रता, शाखानिहाय अटी, GATE स्कोअर आणि इतर नियम काळजीपूर्वक तपासावेत.

Previous

राज ठाकरे सकाळीच ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा, भेटीमागे नेमकं कारण काय?

Next

HSRP नंबर प्लेट अजून बसवली नाही? परिवहन विभागाची आता धडक कारवाई; विशेष पथकं तैनात

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top