Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

Pune RTO: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! ‘MH 12 ZZ’ नंतरही कायम राहणार ‘MH 12’; मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या बैठकीत सकारात्मक निर्णय?

By Team Lagav Batti / August 8, 2026

पुणे शहराची ओळख बनलेला ‘MH 12’ हा आरटीओ (RTO) कोड यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नवीन वाहन नोंदणीसाठी ‘MH 12 ZZ’ ही शेवटची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर पुण्याच्या वाहनांसाठी नवीन सिरीज कोणती असणार, याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर या विषयावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

‘MH 61’ च्या चर्चांना पूर्णविराम?

पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘MH 12 ZZ’ मालिका संपल्यानंतर पुण्याला ‘MH 61’ हा नवीन आरटीओ कोड दिला जाऊ शकतो, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, ‘MH 12’ हा कोड गेल्या अनेक दशकांपासून पुण्याची ओळख बनला असल्याने तो बदलू नये, अशी पुणेकरांची भावना होती.

‘MH 12’ कायम ठेवण्यासाठी नवा प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या बैठकीत ‘MH 12’ हा कोड कायम ठेवत देशात पहिल्यांदाच एक अंक आणि एक अक्षर (One Number-One Letter) या पद्धतीने नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

या प्रस्तावानुसार ‘MH 12 1A’, त्यानंतर ‘MH 12 1B’, अशा स्वरूपात पुढील नोंदणी मालिका सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर माहिती देताना म्हटले की, “MH 12 ही पुण्याची ओळख आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी विनंती मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेत MH 12 कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, सध्या ‘MH 12 ZZ’ ही शेवटची मालिका सुरू असून पुढील पर्यायी मालिकेची प्रक्रिया सुरू आहे. पुणेकरांच्या भावना लक्षात घेऊन हा विषय गांभीर्याने मांडण्यात आला.

‘MH 12’ हीच पुण्याची ओळख

पुण्यातील बहुतांश वाहनांवर ‘MH 12’ हा कोड गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे. त्यामुळे हा केवळ वाहन नोंदणी क्रमांक नसून पुण्याची स्वतंत्र ओळख म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे हा कोड कायम ठेवण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

लवकरच अधिकृत निर्णय अपेक्षित

केंद्रीय स्तरावर या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आता परिवहन मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी झाल्यानंतर ‘MH 12 1A’ किंवा तत्सम स्वरूपातील नवीन नोंदणी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याची ओळख असलेला ‘MH 12’ कोड यापुढेही कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

Previous

Vijay Divorce: CM विजय थलपती यांचा घटस्फोट होणार नाही? पत्नी संगीताने मागे घेतली याचिका..

Next

कॉकरोच जनता पार्टीची 12 जणांची टीम; सर्वच 35 वर्षांखाली, जाणून घ्या कोण आहेत हे चेहरे

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top