2026-2027 या वर्षासाठीचा केंद्रिय अर्थसंकल्प नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. यात नवीन आयकर कायदा हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच पगारदारांसाठी ITR-1 आणि ITR-2 भरण्यासाठीची अंतिम मुदत आता 31 जुलैपर्यंत असेल अशी घोषणा केली.
करदात्यांसाठी कोणत्या अधिकच्या घोषणा या अर्थसंकल्पात आहेत ते पाहा….

- ऩॉन ऑडिट बिझनेस आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असेल.
- उत्पन्नाची माहिती न देणे, करचोरी करणे आता महागात पडणार.
- करदात्याने जाणून बुजून चुकीची माहिती दिल्यास थकीत कराच्या 100% दंड भरावा लागेल.
- परदेशातल्या आरोग्य आणि शिक्षणावरचा TCS 5% वरून 2% करण्यात आला आहे.
- परदेश प्रवासही स्वस्त होणार असून पर्यटकांवर कराचा बोजा कमी होणार आहे.
- अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाहीए.
