Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

“पती असावा तर निक जोनससारखा…”

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोड किस्स्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सहभागी झाली होती.

या कार्यक्रमात तिने तिच्या आणि पती निक जोनस यांच्या नात्यातील अनेक न ऐकलेले, रोमँटिक किस्से शेअर केले. हे किस्से ऐकून प्रेक्षकांसह चाहत्यांची मनं जिंकली गेली.

सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या करवा चौथच्या सेलिब्रेशनची. प्रियांकाने सांगितलं की, भारतीय संस्कृती आणि परंपरांचा निक मनापासून आदर करतो. एका वर्षी करवा चौथच्या दिवशी प्रियांका उपवास धरून चंद्राची वाट पाहत होती, पण हवामानामुळे चंद्र दिसत नव्हता.

त्या दिवशी ते एका स्टेडियममध्ये होते, जिथे शो सुरू होता. रात्रीचे १०–११ वाजले होते, ढग दाटले होते आणि पावसाचीही शक्यता होती. उपवास सोडण्यासाठी चंद्रदर्शन आवश्यक होतं, पण चंद्र काही केल्या दिसत नव्हता.

अशा वेळी निक जोनसने जे केलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. प्रियांकाचा उपवास पूर्ण व्हावा यासाठी निक तिला थेट प्रायव्हेट प्लेनने ढगांच्या वर घेऊन गेला. विमानातून ढगांच्या वरचा लख्ख चंद्र दिसताच प्रियांकाने आपला उपवास सोडला.

निकच्या या रोमँटिक कृतीने कपिल शर्मा यांच्यासह स्टुडिओतील सर्व प्रेक्षक अचंबित झाले. हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी निक जोनसचं भरभरून कौतुक केलं.

पती असावा तर निक जोनससारखा!” अशा कमेंट्स नेटकरी करत असून, हा किस्सा आजच्या काळात नात्यातील समजूतदारपणा, प्रेम आणि आदर यांचं सुंदर उदाहरण ठरत आहे.

More From Author

1 comment

Thank you for the good writeup. It in fact was once a leisure account it.
Look complicated to far delivered agreeable from you!
However, how could we keep in touch?

Leave a Reply to digital banking Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *