Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

नानांनी शिवाजी पार्क गाजवलेलं; पण तरीही क्रिकेट का सोडलं?

By Team Lagav Batti / October 8, 2026

आज नाना पाटेकर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा दमदार अभिनय, आवाज आणि भन्नाट संवाद. पण पडद्यावर येण्याआधी नाना एका वेगळ्याच मैदानावर आपलं नशीब आजमावत होते… क्रिकेटच्या मैदानावर. मुंबईच्या शिवाजी पार्कवर नाना क्रिकेट खेळायचे. हे तेच मैदान, जिथे पुढे भारतीय क्रिकेटमधलं मोठं नाव ठरलेले सुनील गावस्करही खेळायचे. गावस्कर हे नानांचे आदर्श होते आणि क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड होती. एका जुन्या मुलाखतीत नानांनी क्रिकेटच्या दिवसांची आठवण सांगताना आणखी एक रंजक गोष्ट सांगितली होती. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले संदीप पाटीलही त्यांच्यासोबत खेळले होते. म्हणजे अभिनयाच्या दुनियेत येण्याआधी नानांचा बराच वेळ क्रिकेटच्या मैदानावरच जायचा. पण मग अचानक या खेळापासून दूर जाण्याची वेळ आली.

नानांच्या बोटाला दुखापत झाली आणि क्रिकेटच्या वाटेत अडथळा आला. त्यातच घरची परिस्थिती अशी होती की आई-वडिलांना आधार देण्यासाठी त्यांना काम करणं गरजेचं होतं. त्यामुळे क्रिकेटला पूर्णवेळ देणं शक्य झालं नाही. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. क्रिकेट मागे सोडून नानांनी कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे रंगभूमी आणि मग चित्रपट… आणि ज्या व्यक्तीने कधी शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळलं होतं, त्याच व्यक्तीने पुढे अभिनयाच्या मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कदाचित त्या एका दुखापतीनं नानांना क्रिकेटपासून दूर केलं; पण त्याच वळणावरून ते अभिनयाच्या जगात आले. पुढे ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘नटसम्राट’सारख्या भूमिका त्यांच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग बनल्या. क्रिकेटमध्ये त्यांचं करिअर घडलं नाही… पण आयुष्याने त्यांना अभिनयाचं मैदान दिलं आणि तिथे नाना पाटेकरांनी आपला वेगळाच ठसा उमटवला.

Previous

वडार समाजाला मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दिलासा! दगड उत्खननासाठी रॉयल्टीमुक्त मर्यादा वाढली…

More Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top