Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

NEET कायमची रद्द करा! TVK ची केंद्र सरकारकडे मोठी मागणी; शिक्षणाचा विषय पुन्हा राज्यांच्या अखत्यारीत देण्याची मागणी

By Team Lagav Batti / July 23, 2026

देशभरात NEET परीक्षेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तमिळगा व्हेट्री कळघम (TVK) पक्षाने केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. NEET परीक्षेतील केवळ गैरप्रकार आणि अनियमितता रोखून प्रश्न सुटणार नाही, तर ही राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा कायमची रद्द करण्यात यावी, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि TVK चे अध्यक्ष जोसेफ विजय यांच्या पक्षाने वैद्यकीय शिक्षणासह शिक्षण क्षेत्रातील निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारकडून काढून राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी केली आहे. यासाठी शिक्षण हा विषय राज्यघटनेतील समवर्ती सूचीमधून काढून पुन्हा राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, असा प्रस्ताव पक्षाने मांडला आहे.
मात्र, हे तातडीने शक्य नसल्यास तात्पुरता उपाय म्हणून ‘विशेष समवर्ती सूची’ तयार करण्यात यावी आणि त्याद्वारे शिक्षण व वैद्यकीय शिक्षणासंदर्भात राज्यांना अधिक अधिकार देण्यात यावेत, अशी मागणीही TVK ने केली आहे.
दरम्यान, आपल्या पत्रकातून TVK ने विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “सत्तेत आल्यानंतर NEET रद्द करू”, अशी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणारे राजकारण आम्ही करणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
याचदरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या NEET विरोधी आंदोलनाला आणखी एक वळण मिळाले आहे. CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या मागण्यांमध्ये आणखी एका मागणीची भर घातली आहे. २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू नये, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.
आता NEET परीक्षा रद्द करण्याच्या या मागणीवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Previous

NEET Paper Leak : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; दोषींवर जलद कारवाईसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट

Next

MPSC कडून राज्यसेवा निवड प्रक्रियेत मोठा बदल; मुलाखतीचे गुण 275 वरून 175 वर

Related Posts

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Leave a Comment / राजकारण / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top