Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

मराठवाडा मध्यरात्री हादरला! हिंगोली जिल्ह्यात 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये भीती,,,

By Team Lagav Batti / July 2, 2026

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यासह मराठवाड्यातील काही भागांना बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा आणि जलालदाभा परिसरात, जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर खोलीवर होता.


भूकंपापूर्वी भूगर्भातून मोठा गडगडाटासारखा आवाज आल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यानंतर काही सेकंद घरांना हादरे बसल्याने अनेकजण झोपेतून घाबरून जागे झाले. काही ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या काचा थरथरल्या, तर घरातील भांडीही हलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. परिस्थितीची जाणीव होताच अनेकांनी लहान मुलांसह घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
या भूकंपाचे धक्के फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर आणि जांब या गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा आणि गिरगाव परिसरातही जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, या भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के आणि भूगर्भातून आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाकडून पाहणी आणि जनजागृती केली जात असली, तरी वारंवार होणाऱ्या या भूकंपांचे नेमके कारण काय, तसेच त्यामागील शास्त्रीय विश्लेषण आणि दीर्घकालीन उपाययोजना काय असतील, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Previous

‘बाई’ नावामागची गोष्ट.. विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला दिलेली नवी ओळख!

Next

संगीत क्षेत्रासाठी सरकारची मोठी घोषणा! आशा भोसले यांच्या नावाने ‘जीवन गौरव पुरस्कार’; विजेत्याला १० लाखांचे बक्षीस

Related Posts

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti
Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top