Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

हिंद केसरीच्या फायनलनंतर मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळचा महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप

By Team Lagav Batti / May 19, 2026

साताऱ्यात झालेल्या 52 व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळने विजेता महेंद्र गायकवाडवर नियमबाह्य डाव खेळल्याचा आरोप केला आहे.


अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने अवघ्या 20 सेकंदांत पृथ्वीराज मोहोळचा पराभव करत हिंद केसरी किताब जिंकला. पण सामना संपल्यानंतर पृथ्वीराजने सांगितले की, महेंद्रने त्याचा हात चुकीच्या पद्धतीने पकडून जोरात पिरगळला. त्यामुळे हाताला गंभीर दुखापत झाली आणि पुढे खेळणे शक्यच झाले नाही.
पृथ्वीराजच्या म्हणण्यानुसार, “महेंद्रने माझा हात दोन्ही हातांनी पकडून वळवला. त्यामुळे माझ्या हाताला खूप दुखापत झाली. त्याचा उद्देश मला जखमी करण्याचाच होता.” याबाबत आपण कुस्ती फेडरेशनकडे तक्रारही दिल्याचे त्याने सांगितले.


पृथ्वीराजने आणखी एक गंभीर दावा करत म्हटले की, महेंद्र गायकवाडवर याआधीही अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. काही इतर पैलवानांनाही अशाच प्रकारे दुखापत झाल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात महेंद्रने डाव टाकताना पृथ्वीराजचा उजवा हात पकडल्याचे दिसत आहे. त्यावेळी हात उलटा झाल्याने काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. मात्र दुखापत गंभीर असल्याने पृथ्वीराजला सामना पुढे खेळता आला नाही. त्यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाडला विजेता घोषित केले.
या संपूर्ण प्रकारामुळे आता हिंद केसरी स्पर्धेच्या निकालावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कुस्ती फेडरेशन यावर काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous

मोदींच्या UAE दौऱ्यात मोठे करार; भारताला ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात मोठा फायदा !

Next

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, अंतिम निर्णय आता सरकारच्या हाती

Related Posts

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

पेट्रोल-डिझेल महागलं, गिग वर्कर्स रस्त्यावर; Swiggy, Zomato, Uber सेवांवर परिणाम !

Leave a Comment / व्हायरल गोष्टी, सामाजिक / By Team Lagav Batti
नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, अंतिम निर्णय आता सरकारच्या हाती

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, अंतिम निर्णय आता सरकारच्या हाती

Leave a Comment / सामाजिक / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top