Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

विजयने अशी दिली होती रश्मिकासोबतच्या प्रेमाची कबुली

By Team Lagav Batti / February 28, 2026

नुकताच नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय या दोघांचा अतिशय पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. त्याचे फोटोज् आणि व्हिडिओज् सोशलमीडियावर व्हायरल होताएत.. पण विवाहापर्यंत पोहोचलेली त्यांची लव्हस्टोरी सुरु कुठून झालेली? त्याची ही गोष्ट…


गीता गोविंदम हा रश्मिका आणि विजय या दोघांचा पहिलाच चित्रपट. त्यात शेवटी जसा दोघांचा पारंपरिक पद्धतीने विवाह झाला होता, अगदी तसाच विवाह आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात या दोघांचा झाला आहे. २६ फेब्रुवारीला उदयपुरला दोघांनी निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्नं केलं. विजय आणि रश्मिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या मैत्रीची सुरुवात गीता गोविंदम आणि डिअर कॅाम्रड या सोबत केलेल्या चित्रपटांपासून झाली. दोघे चांगले मित्र होते. पण दोघांनीही कधी आपलं हे नातं जगजाहीर केलं नव्हतं. मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांनी हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडा केला. आणि आता त्यानंतर थेट लग्नाच्या काही दिवस अगोदर त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याबद्दल सांगितलं.

विजयने म्हटलं की, माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीशी मी आता विवाहबद्ध झालो आहे. तसचं मागे घडलेला एक किस्सा त्यानं सांगितला. तो म्हणजे, एके दिवशी त्याला तिची आठवण खूप येत होती. त्याला तिची इतकी आठवण आली होती की त्याला वाटायचं की जर ती त्याच्यासोबत असेल तर त्याचा दिवस चांगला जाईल. ती त्याच्यासमोर बसली असेल तर त्याचं जेवण अधिक चवदार होईल, वर्कआउटही सोपं जाईल. ती आपल्या सोबत असायला हवी होती असं त्याला वाटू लागलं. ती तीव्र इच्छा त्याच्या मनावर परिणाम करून गेली.

रश्मीकाने म्हंटलं की, ज्या माणसानं तिला खऱ्या प्रेमाचा अर्थ शिकवला, ज्यानं तिला शांततेचा अनुभव दिला, तो आता तिचा पती झाला आहे. त्याच्या सोबत असण्याने तिच्या आयुष्यातील संघर्षाला आणि यशाला अर्थ प्राप्त झाला आहे. ती विजयची पत्नी म्हणून ओळखली जाणार या गोष्टीसाठी ती खूप जास्त उत्साहित आहे.
त्यांचे लग्नाचे फोटो काल सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले. आणि काही तासांतच ते प्रचंड व्हायरल झाले. त्यांचा दोघांचा तो पारंपरिक लुक मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला हे नक्की !

Previous

राज्याचं नाव बदलायला लागतात इतके कोटी?कायदा, खर्च आणि पूर्ण प्रक्रिया!

Next

प्लास्टिक फुलांवर बंदीचा प्रश्न तापला; Devendra Fadnavis यांची विधानसभेत ग्वाही

Related Posts

Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

Leave a Comment / मनोरंजन / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top