लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने जागांवर दावा करण्यासाठी तयारी करत आहेत. त्यातच चर्चा होत आहे ती म्हणजे फक्त एक आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील हे एकमेव आमदार मनसेचे आहे. मात्र यंदा येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार, याचीच चर्चा जोरदार सुरु आहे.