अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असे १६ आमदार आहेत, ज्यांचा सामना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांविरोधात झाला होता. त्या १६ जागा कोणत्या तर अमळनेर, अर्जुनी मोरगाव, अहेरी, पुसद, इंदापूर, मावळ, वडगाव शेरी, हडपसर, अकोले, माजलगाव, आष्टी, परळी, अहमदपूर, उदगीर, फलटण आणि बारामती. या मतदारसंघातील उमेदवारीवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये अंतर्गत वाद असल्याचं समोर येऊ लागलंय.