नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम ठेवावा लागतो, हे वाक्य आहे भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याचं. सध्या हार्दिक आणि त्याची पत्नी नताशाच्या घटस्फोटची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यातच हार्दिकच्या प्रॉपर्टीवरुन बणणारे मीम्सही तुमच्यापर्यंत आले असतीलचस असो, आपल्या व्हिडीओचा विषय आहे कोण आहे ही नताशा स्टेनकोविक.
सर्बिया देशातील रहिवाशी नताशा स्टेनकोविक ही एक डान्सर आणि मॉडेल आहे. ती बॉलीवूडमध्ये करियर करण्यासाठी भारतात आली. २०१४ मध्ये आलेल्या सत्याग्रह चित्रपटातून तिने करियरमध्ये एन्ट्री केली. सुरुवातीलाच नताशाने बादशहाच्या एका गाण्यामध्ये काम केलं होतं, त्यामुळे बादशाहच्या फॅन्सला नताशा कळाली होती. त्यानंतर ऍक्शन जॅक्सन, फुकरे रिटर्न्स, डॅडी आणि झीरो या चित्रपटांमध्ये नताशाने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.
२०१४ मध्येच नताशाने बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये काम केलं होतं. तर २०१९ मध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंड अली गोनी सोबत ‘नच बलिए’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये नताशाने सहभाग घेतला होता. त्यांनतर २०२० मध्ये नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पंड्या एन्गेज्ड झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. स्वत: हार्दिकनेच याबाबत इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत माहिती दिली होती. त्याच दरम्यान त्यांचं दोनवेळा लग्न झालं आणि आता तुमच्यासमोर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा येऊ लागल्यात.