२०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातल्या तब्बल 15 दिग्गजांची नावं झळकलीएत.

कोण आहेत ही पद्म पुरस्कार विजेते मंडळी? चला बघुयात...

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' देऊन गौरवण्यात आलंय.

आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या अलका याज्ञिक यांना पद्मभूषण मिळालाय  

अभिनेता आर. माधवन याला पद्मश्री जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर झाला आहे.

टीम इंडियाचा लाडका कर्णधार रोहित शर्मा देखील आता 'पद्मश्री' झाला आहे!  

ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांनी 'तारपा' वादन जागतिक स्तरावर जिवंत ठेवल्याबद्दल पद्मश्री दिला गेलाय.

रघुवीर खेडकर यांना तमाशाला जागतिक स्तरावर जिवंत ठेवल्याबद्दल पद्मश्री  देण्यात आलाय.

उद्योजकता आणि अर्थव्यवस्था या विभागातून उदय कोटक यांना पद्मभूषण.  

जाहिरात विश्वाचे बादशहा पीयूष पांडे यांना पद्मभूषण.

अशोक खाडे यांना औद्योगिक विकासातील भरीव योगदानासाठी पद्मश्री.

सत्यनारायण नुवाल यांना औद्योगिक विकासातील भरीव योगदानासाठी पद्मश्री.

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री

विज्ञान क्षेत्रात जुझर वासी यांना पद्मश्री

कृषी क्षेत्रात श्रीरंग लाड यांना पद्मश्री

समाजसेवेसाठी जनार्दन बोथे यांना पद्मश्री