तामिळनाडूमधील कांचीपुरमला
‘हजार मंदिरांचे शहर’
का म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का ?
कांचीपुरम हे
हे दक्षिण भारतातील
प्राचीन आणि पवित्र शहर मानलं जातं.
या शहरात एकेकाळी
सुमारे १,००० मंदिरे होती.
म्हणूनच याला
“हजार मंदिरांचे शहर” म्हणतात.
ईथली अनेक मंदिरे
पल्लव, चोल आणि
विजयनगर साम्राज्याच्या
काळात बांधली गेली.
ईथली प्रसिद्ध मंदिरे म्हणजे
एकंबरेश्वर मंदिराचे उंच गोपुरम
आणि वरदराजा पेरूमल मंदिर
याचा शंभर खांबांचा मंडप.
७व्या शतकात चिनी प्रवासी
सुआन झांग
याने येथे भेट दिली होती.
त्याने ईथल्या शिक्षण आणि संस्कृतीचे कौतुक केले.
१ जुलै १९९७
रोजी
कांचीपुरम स्वतंत्र जिल्हा झाला.
आजही हे शहर
मंदिर वास्तुकला, परंपरा
आणि आध्यात्मिक वारशासाठी
जगभर प्रसिद्ध आहे.