मोदी ३.० सरकारची पहिली कॅबिनेट बैठक १९ जून रोजी पार पडली. या पहिल्याच बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. निर्णयाची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. निर्णय आहे डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्याला मंजुरी त्या बदद्लचा. तब्बल २५ वर्षांपासून जो प्रश्न रखडला होता, त्याच्या बांधणीला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. वाढवण बंदर इतकं महत्त्वाचं का आहे? देशासह मुंबईला या बंदराचा काय फायदा होणार आहे? याच्या बांधणीचा एकूण खर्च किती असणार आहे? या बंदराला जगातील Top 10 बंदरापैकी एक असं का म्हटलं जातंय? अशा अनेक मुद्द्यांबद्दल आपण या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.