IPL संपल्यानंतर लगेचच चर्चा सुरु झाली ती टी-20 वर्ल्ड कपची. येणाऱ्या २ जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होतंय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये यंदाचे वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. भारत विरुद्ध आयरलँड असा पहिला सामना ५ जूनला, तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना ९ जूनला होणार आहे. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असेल, तर उपकर्णधार हार्दिक पांड्या असेल. या सामन्यांसाठी भारताच्या संभाव्य टीममध्ये कोण असेल, तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू असू शकतात. तर राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश असणार आहे. भारताचा तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेविरुद्ध आणि चौथा सामना 15 जून रोजी कॅनडा विरुद्ध असणार आहे.