अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्रात ३० हून अधिक आमदार आहेत. १ लोकसभेचे खासदार आणि एक राज्यसभेचे खासदार आहेत. त्यात अजून एक भर पडलेय ती म्हणजे सुनेत्रा पवार यांची. आता अजित पवार यांच्याकडे दोन राज्यसभेचे खासदार झालेत. याउलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ८ लोकसभेचे खासदार आणि २ राज्यसभेचे खासदार आहेत. आता शरद पवार यांच्या तुलनेत अजित पवार यांची संख्या जरी कमी असली तरी मात्र चर्चा होत आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या मंत्रीपदाची.