Lagavbatti

day, 00 month 0000

नेमका सीन काय?

Sheena Bora murder case

Sheena Bora murder case : शिना बोराची हाडं गायब कशी झाली? इंद्राणी मुखर्जीचे CBI वर आरोप काय आहेत?

एका कंपनीमध्ये एक कपल असतं. तो कंपनीचा CEO असतो , तर ती कंपनीची HR असते. दोघांची ओळख वाढली, मैत्री झाली, प्रेम झालं आणि दोघांनीही लग्न करायचं ठरवलं. बरं हे दोघंही सिंगल नव्हते. तर तिचं आधी एक लिव्ह इन रिलेशनशीप होतं, त्यानंतर दोन लग्नं झाली होती, तर त्याचं याआधीही एक लग्नं झालं होतं. याव्यतिरिक्तही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, लग्नही झालं, पण जसा संसार सुरु झाला, तसा त्यांचाच भुतकाळ त्यांच्या भविष्याची आडकाठी बनू लागला आणि अचानक त्याच भुतकाळाला नाहीसं करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. आता ही स्टोरी तुम्हाला कुठल्या तरी चित्रपटासारखी वाटत असेल, पण थांबा. ही कहाणी आहे देशातल्या हायप्रोफाईट केसची, एका आईने रचलेल्या मुलीच्या खुणाच्या कटाची. कहाणी आहे शिना बोरा हत्याकांडाची.

इंद्रानी ही आपल्या पहिल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांना दोन आपत्य झाली. शिना बोरा आणि निखाई बोरा. यानंतर इंद्रायनीचं त्रिपुरामधील एका व्यक्तीशी कायद्याने पहिलं लग्न झालं. पण काही महिन्यातच दोघे वेगळे झाले. त्यांना कोणतंच आपत्य नव्हतं. इंद्रायनीचं कायद्याने दुसरं लग्न झालं कोलकातामधील संदीप खन्नासोबत. इंद्रायनी आणि संदीप या दोघांना एक मुलगी झाली, जिचं नाव विधी आहे. यानंतर इंद्रायनीने पिटर मुखर्जीसोबत लग्न केलं. या दोघांना कोणतंच आपत्य नाही. म्हणजेच इंद्रायणी मुखर्जीच्या पोटी एकूण तीन मुलांनी जन्म घेतला, शिना बोरा, निखाई बोरा आणि विधी. आता पिटर मुखर्जीचा फॅमिटी ट्री पाहू. पिटर मुखर्जीचं पहिलं लग्न झालं शबनम नावाच्या महिलेसोबत. या दोघांना दोन आपत्य, एक राहुल मुखर्जी आणि दुसरा रॉबिन मुखर्जी. दुसरं लग्न झालं इंद्रायणी मुखर्जीसोबत. आता या दोघांच्या प्रेम कहाणीवर थोडासं फोकस करु.

पीटर मुखर्जी हे निवृत्त ब्रिटीश टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह होते, त्यांनी 1997 मध्ये स्टार इंडिया कंपनीची स्थापना केली. 2007 मध्ये पिटर मुखर्जीने INX मिडिया कंपनीची स्थापना केली, त्यात पिटर मुखर्जी चेअरमन तर इंद्रायणी मुखर्जीला सीईओ केलं जातं. 2002 पिटरची ओळख इंद्रायणीशी झाली. स्टार इंडियामध्ये इंद्रायणी HR म्हणून काम करु लागली. पिटरपेक्षा तब्बल 16 वर्षांनी इंद्रायणी लहान होती. व्हिडीओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोघांमध्ये मैत्री झाली, प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. लग्नावेळी पिटरचं वय साधारण ४६ तर आणि इंद्रायणीचं वय साधारण ३० च्या आसपास होतं.

इंद्रायणीने तिच्या कायद्याने दुसऱ्या पतीसोबत झालेल्या मुलगी म्हणजेच विधी खन्नाला आपल्यासोबत घेतलं. पिटर मुखर्जीनेही ते मान्य केलं. पण इथं एक ट्विस्ट असा आला की लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असताना झालेल्या मुलीची ओळख म्हणजेच शिना बोराची ओळख इंद्रायणीने आपली बहिणी म्हणून करुन दिली. अजून थोडं सोप्प करुन सांगतो. इंद्रायणीला लिव्ह इनमध्ये असताना दोन मुलं झाली होती, मुलगी शिना आणि मुलगा निखाई. इंद्रायणीची मुलगी म्हणजे ती पिटर मुखर्जीचीही मुलगी असायला पाहिजे. पण इंद्रायणीने खोटं सांगितलं. शिना ही आपली बहिणी असल्याची खोटी माहिती इंद्रायणीने पिटरला दिली. म्हणजेच शिना ही नात्याने पिटरची मेहुणी झाली. शिना बोराही आपली खरी ओळख लपवून मुंबईमध्ये राहू लागली, पिटरच्या घरामध्ये वावरु लागली.

आता रोल सुरु होतो शिना बोरा आणि राहुल मुखर्जी यांचा. राहुल मुखर्जी कोण? तर पिटर मुखर्जी यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा. पिटर मुखर्जीच्या घरी शिना बोरा आणि राहुल मुखर्जीची अनेकदा भेट व्हायची. शिनाला माहिती होतं की राहुल हा आपल्याला नात्याने सावत्र भाऊ लागतो, पण राहुलला माहिती नव्हतं की शिना ही आपली सावत्र बहिण आहे, तो शिनाला सावत्र आई म्हणजेच इंद्रायणीची बहिण माणायचा. कारण इंद्रायणीनेच शिनाची तशी ओळख मुखर्जी कुटुंबासमोर केली होती. यापुढे झालं काय तर शिना आणि राहुल एकमेकांच्या प्रेमात पडले. हीच गोष्ट इंद्रायणीच्या कानावर पडली, इंद्रायणीला दोघांचं नातं खटकू लागलं. शिना आणि इंद्रायणीमध्ये वाद होऊ लागला; पण राहुल किंवा पिटर मुखर्जीला सत्य सांगण्याचं धाडस इंद्रायणीमध्ये नव्हतं.

राहुल मुखर्जी आणि शिना बोरा या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. आपल्या कुटुंबाला तसा निर्णय सांगितला. पिटर मुखर्जीला या दोघांच्या लग्नावर कोणताच आक्षेप नव्हता. पण इंद्रायणीला होता. कारण हे दोघं भाऊबहिण आहेत, हे फक्त इंद्रायणी आणि शिनाला माहिती होतं. फक्त भावा-बहिणीचं नातं आहे म्हणून इंद्रायणी त्या दोघांना विरोध करत नव्हती, तर अजून एक कारण होतं ते म्हणजे प्रॉपर्टी. राहुल आणि शिनाचं लग्न झालं तर पिटर मुखर्जीची सगळी संपत्ती त्या दोघांना मिळणार होती. इंद्रायणीला काहीच मिळणार नव्हतं. मग ठरलं काय तर शिना बोराचा काटा काढायचा.

या हत्तेत इंद्रायणीने इतर दोघांना सोबत घेतलं. एक होता तिचा विश्वासू कार चालक श्याम राय, दुसरा व्यक्ती होता इंद्रायणीचा दुसरा पती संदीप खन्ना. दिवस होता २४ एप्रिल २०१२. आपल्यातले वाद मिटवायचे आणि राहुलसोबत लग्नाला परवानगी द्यायच्या उद्देशाने इंद्रायणीने शिनाला भेटायला बोलावलं. मुंबईच्या वांद्रे इथल्या एका ठिकाणी गाडीमध्ये बसवून घेतलं, शिनाला पिण्यासाठी पाणी दिलं, ज्या पाण्यात बेहोशीचं औषध टाकलं होतं. शिना बेहोश होताच, चालक श्याम रायने शिनाचे पाय पकडले आणि इंद्रायणी आणि संदीप खन्नाने शिनाचा गळा आवळला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. हे तिघेही शिनाला घेऊन रायगडच्या एका जंगलात गेले. तिथे शिनाचं शरीर जाळलं आणि अर्धवट जळालेलं शरिर एका सुटकेसमध्ये भरून तिथल्याच झाडाखाली सोडून दिली. यावेळी शिनाचं वय अवघं 24 वर्षे इतकं होतं. काही दिवसांनीच तिथल्या स्थानिकांना सुटकेसमध्ये माणसाचं अर्धवट जळालेलं शरीर असल्याचा संशय आला, स्थानिक पोलिसांनी तपास केला पण त्यांनाही काही सुगाव न लागल्याने उरलेलं शरिरही जाळलं आणि तिथेच पुरलं.

याचदरम्यान शिना US ला गेल्याचं सांगून इंद्रायणीने सगळ्यांपासून तिच्या हत्येची गोष्ट लपवून ठेवली. पण त्याच्या तीन वर्षांनी म्हणजे 21 ऑगस्ट 2015 रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना एक निनामी फोन येतो, ज्यात शिना बोराची हत्या, तिची आई इंद्रायणी मुखर्जीने केल्याचं सांगण्यात येतं. संबंधित प्रकरणात देशातील नामवंत महिलेचं नाव आल्यामुळे पोलीस आयुक्तही कामाला लागतात आणि आपला विश्वासू दिनेश कदम यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवतात. तपास सुरु होतो, अनेक नावं, घटना समोर येऊ लागताl, नवनवे खुलासे होऊ लागतात. या प्रकरणात पहिली अटक होतेय संबंधित चालक श्याम राय याला, श्याम राय पोलिसांसमोर सगळी हकिकत सांगतो आणि त्याच्या जबाबवरुनच ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्रायणी मुखर्जी आणि आणि तिचा दोन नंबरला पती संजीव खन्नालाही मुंबई खार पोलिसांकडून अटक केली जाते. प्रकरण दिवसेंदिवस वाढत जातं, परिणामी राज्य सरकारकडून हे प्रकरण 29 सप्टेंबर 2015 रोजी सीबीआयकडे वर्ग केले जाते. सीबीआयकडून तपास सुरु होतो आणि पिटर मुखर्जीलाही या प्रकरणात अटक केली जाते. आतापर्यंत चौघांना या प्रकरणात अटक केली जाते.

चौकशी पुढे पुढे जाते, पिटर मुखर्जीचा या प्रकणात कोणताच थेट संबंध नसल्याच्या कारणावरुन जामीन मिळतो, तर तब्बल साडेसहा वर्षांनंतर 2022 च्या दरम्यान इंद्रायणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्याम राय या तिघांनाही शिना बोरा हत्या प्रकरणातून जामीन मंजूर झाला. आता बॅक टू CBI चे वकील. २०१५ मध्ये पोलिसांनी जी माणवी शरिराची हाडं जमा केली होती, ती अचानक गायब झाल्याची माहिती CBI च्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दिली. DNA अथवा इतर कोणत्याच गोष्टींचा तपास करता न आल्याने संपूर्ण तपास यंत्रणाच थांबली. पुरव्यांअभावी प्रकरणात अडकलेल्या सगळ्यांना जामीन मिळाला. आता याच प्रकरणात इंद्रायणी मुखर्जींनी मोठे खुलासे करायला सुरुवात केलीये.

जामीनावर बाहेर असलेल्या इंद्रायणी मुखर्जीने माध्यमांना काय माहिती दिलीये ते पाहा. रक्षकच भक्षक झालेत. अशा दोन पिशव्या, ज्यात एका मानवी शरिराची अस्ती आणि हाडं होती, त्या कशा गायब होऊ शकतात. मला या प्रकरणात मुद्दामहून अडकवलं गेलंय. चुकीच्या पद्धतीने मला अटक करण्यात आली. मी आधीपासूनच सांगत आली आहे की शीना बोरा ही शेवटच्यावेळी राहुल मुखर्जीसोबत दिसली होती, मग माझ्या जबाबानुसार राहुल मुखर्जीची चौकशी का झाली नाही. अगोदरच मला अडकवण्याचा कट होता आणि त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली जात होती. जर मी आरोपी असती तर 2012 मध्ये सापडलेल्या मानवी हाडांची डीएनए चाचणी का झाली नाही, जर ती झाली असती तर ती हाडं शिनाची नाहीत हे उघड झालं असतं. मी नेहमीच कोर्टासमोर सांगत आली आहे की शीना जिवंत आहे, पण ती कुठे आहे, हे आम्हाला माहिती नाही. शीनाचा मृत्यू झाल्याचे अद्यापपर्यंत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

शिना बोरा हत्याकांडाचं २०१२ मध्ये सुरु झालेलं हायप्रोफाईल प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. कथित मानवी हाडं गायब झाल्यामुळेच आता इंद्रायणी मुखर्जीकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर नेटफ्लिक्स या डिजीटल प्लॅटफॉवर ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ नावाची वेब सीरिजही आली आहे. त्यामध्येही हे प्रकरण काही प्रमाणात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा आणि अशाच व्हिडीओंसाठी आमच्या लगावबत्तीला आताच सबस्क्राईब करा. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.

Scroll to Top