२० जून रोजी देशात जागतिक रेफ्युजी डे साजरा केला जातो. रेफ्युजी डे म्हणजे जागतिक निर्वासित दिन. एखादा व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणं. महापूर, कोणती तरी महामारी, बेरोजगारी, हिंसाचार, एखादं युद्द, अशा अनेक कारणांमुळे लोकं स्थलांतरित होतात. अशा स्थलांतरित लोकांना जगात ओळख आणि मदत मिळावी यासाठी २० जून रोजी जागतिक रेफ्युजी डे साजरा केला जातो. पण या दिवसाची खरंच गरज आहे का? आत्तापर्यंत निर्वासितांची संख्या किती आहे? निर्वासितांना नेमकं कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय? हेच आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत.