१९ मे २०२४ रोजी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या अपघाताने पुणे हादरलं होतं. एक पोर्श कार भरधाव वेगाने येते आणि एका दुचाकीला मागून जोरात धडक मारून पुढे जाते. ही घटना आहे पुण्याच्या कल्याणीनगर भागातली. मध्यधुंद अवस्थेतल्या एका अल्पवयीन मुलाने शहरातून भरधाव कार चालवली आणि दुचाकीवरुन जाणाऱ्या अश्विनी कोष्ठा आणि अनिष अवधिया या दोघांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हेच आपण १२ मुद्द्यांमध्ये जाणून घेऊ.
पहिला मुद्दा
ज्या गाडीने दुचाकीला धडक दिली होती, ती गाडी पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांची होती. विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल हा गाडी चालवत होता. तो अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायविंग लायसन्स नव्हते. १२ वी पास झाल्याच्या निमित्ताने तो मित्रांसोबत पार्टी करत होता. वेदांतचं वय हे १७ वर्षे ८ महिने आहे.
दुसरा मुद्दा
वेदांत अग्रवाल हा पुण्यातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबमध्ये पार्टी करत होता. अल्पवयीन असतानाही पबमध्ये एन्ट्री कशी दिली, हा प्रश्न समोर करत दोन्ही पब पोलिसांनी सील केले आहेत, तर दोन्ही पबचे मालक प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतरचे पुढील तीन दिवस त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बालन्याय अधिनियम २०१५ अंतर्गत पबच्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
तिसरा मुद्दा
पुणे शहरातील कल्याणीनगरच्या भागात १९ मे रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक महागडी कार भरधाव वेगाने येते आणि दुचाकी गाडीला जोरदार धडक देते. या गाडीचा वेग जवळपास १५० किलोमीटर प्रती तास होता. या गाडीचा वेग सांगणारे एक CCTV फुटेजही व्हायरल होत आहे. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की त्या कारची दुचाकीला बसलेली धडक किती मोठी असू शकते.
चौथा मुद्दा
अपघातामध्ये मृत झालेले दोघेही मध्यप्रदेशच्या जबलपूरमधले आहेत. तरुणीचं नाव अनिष अहूदिया आणि तरुणीचे नाव अश्विनी कोष्ठा असं आहे. हे दोघेही गेले आठ वर्षांपासून पुण्यात राहतात. अपघात झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोघांचे कुटुंब पुण्यात आले होते, त्यांनी आरोपीला ताब्यात घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाला केलं आहे. हे दोघेही IT क्षेत्रात काम करत होते, आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर कल्याणीनगर भागातून नगरच्या दिशेने प्रवास करत होते.
पाचवा मुद्धा
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी वेदांत अग्रवालला मारहाण केली, त्यानंतर येरवडा पोलिसांनी वेदांतला ताब्यात घेतलं. अपघातावेळी ही गाडी दारु पिऊन वेदांत अग्रवाल चालवत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली, या अटकेनंतर काही तासातच वेदांतची जामीनावर सुटना झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. वेदांतवर पोलिसांनी कलम ३०४-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या कलमातील गुन्हा हा जामीनपात्र असतो. याच गोष्टींमुळे वेदांतला अवघ्या १२ तासाच्या आत जामीन मंजूर झाला.
सहावा मुद्दा
वेदांत अग्रवाल याला अटक केल्यानंतर त्याला व्हेकेशन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने जामीन देताना अनेक काही अटीशर्थी समोर ठेवल्या आहेत. अपघातावर तीनशे शब्दांमध्ये निबंध लिहणे, १५ दिवस ट्राफीस कॉन्स्टेबलसोबत उभे राहून वाहतुकीचं नियोजन करणं, वाहतुक जागरुतीचे फलक रंगवायचे, माणसोपचार तज्ञाकडून उपचारे घेणे, कुठे अपघात झाला तर त्या अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या अटीवर न्यायालयाने वेदांत अग्रवालची सुटका केली.
सातवा मुद्दा
वेदांत अग्रवालची जरी जामीनावर सुटका झाली असली तरी त्याचे फरार असलेले वडील विशाल अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली आहे आणि न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या पोलीस चौकशीच्या कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. विशाल अग्रवाल हे ब्रह्मा रियल्टीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. अल्पवयीन असतानाही गाडी चालवण्यासाठी का दिली, असा सवाल पुढे करत कारमालक विशाल अग्रवालला अटक केली आहे.
आठवा मुद्दा
संबंधित घटना घडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पुण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, आणि पुण्यातील अपघातासंबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. हा गुन्हा कलम 304-अ नसुन कलम 304 नुसार गुन्हा नोंदवण्याचे आदेश फडणवीसांनी दिले, तसेच आरोपी हा अल्पवयीन असला तरी १६ वर्षांवरील आरोपी असल्याने त्याच्यावर वयस्कर म्हणून कारवाई करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी पोलिसांनी आहे. त्यामुळे बालहक्क मंडळाच्या आदेशाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
नववा मुद्दा
घटना घडल्याच्या काही तासात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे कसबा पेठचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी येरवडा पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दहावा मुद्दा
कल्याणीनगरमध्ये घडलेल्या या अपघातात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव समोर आलं आहे. विशाल अग्रवाल याचा फोन आल्यावर पहाटे 3 वाजता आम्ही येरवडा पोलीस ठाण्यात गेलो, पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसल्याचं स्पष्टीकरण आमदार सुनील टिंगरे यांनी दिलं. या घटनेची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपण कायद्यानुसार कारवाई करावी अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं सुनील टिंगले यांनी सांगितलं.
आकरावा मुद्दा
या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून आरोपींवर कडक कारवाई व्हावी, असे आदेश देण्यात आले आहेत.