१९ मे २०२४ रोजी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या अपघाताने पुणे (Pune) हादरलं होतं. एक पोर्श कार (Porshe Car) भरधाव वेगाने येते आणि एका दुचाकीला मागून जोरात धडक मारून पुढे जाते. ही घटना आहे पुण्याच्या कल्याणीनगर (Kalyaninagar) भागातली. मध्यधुंद अवस्थेतल्या एका अल्पवयीन मुलाने शहरातून भरधाव कार चालवली आणि दुचाकीवरुन जाणाऱ्या अश्विनी कोष्ठा (Ashwini Koshtha) आणि अनिष अवधिया (Anish Awdhiya) या दोघांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. एवढे सगळे घडले असताना देखील आरोपी वेदांत अग्रवाल (Vedant Agarwal) याला पंधरा तासात जमीन मिळून त्याची सुटका झाली. या प्रकरणात आता बरेच खुलासे समोर येत आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? यामध्ये जर आरोपीची सुटका झालेय तर मग शिक्षा कोणाला मिळणार? या सर्व गोष्टींची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.