Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

Olympic Games Paris 2024 : ऑलिम्पिकची नेमकी सुरुवात कधी आणि कशी झाली?

Olympic Games Paris 2024 : When and how exactly did the Olympics begin

२६ जुलै पासून सुरु ऑलिम्पिक सुरु झालाय (Olympic Games Paris 2024). यंदाचे म्हणजेच २०२४ चे यजमान पद हे पॅरिसकडे असणार आहे. यंदा या स्पर्धेत ३२९ खेळांच्या माध्यमातून १०,५०० खेळाडू सहभागी होणार आहेत.ऑलिम्पिकसाठी भारताकडून १२० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ऑलिम्पिक ही जगामधील सर्वात मोठी आणि जुनी स्पर्धा आहे. जवळजवळ प्रत्येक खेळाडूचे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न असते. पण तुम्हाला हे माहितेय का की ऑलिम्पिकला सुरुवात कशी आणि कुठे झाली? यामध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात? हे पद कशाच्या आधारे दिले जाते? अशा सर्व मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.

सुरुवात करू प्राचीन ऑलम्पिक पासून प्राचीन ग्रीसमध्ये इसवीसनपूर्व आठव्या शतकात म्हणजे सुमारे २,७०० वर्षांपूर्वी या क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली होती. ग्रीक संस्कृतीत खेळाच्या स्पर्धांना महत्त्वाचं स्थान होतं. ग्रीक लोकांसाठी ऑलिंपिक हा एक धार्मिक उत्सवही होता. ग्रीक संस्कृतीत झ्यूस हा देवांचा राजा मानला जायचा. त्याच्या सन्मानार्थ ऑलिम्पिया इथे या खेळांचं आयोजन केलं जायचं. इथेच झ्यूसया राजाच मंदिर देखील होतं आणि त्यात त्याची सोनं आणि हस्तिदंतानं मढवलेली मूर्ती होती. तिथे धार्मिक विधीही होत असायचे आणि प्राण्यांचा बळी देण्याचीही प्रथा होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे जशी यात्रा असते तसाच सोहळा ऑलिम्पियामध्ये असायचा. इतर वेळी या भागात युद्ध, लढाया व्हायच्या पण ऑलम्पिकच्या काळात पवित्रता असायची. ऑलिम्पिक स्पर्धेला तेव्हापासूनच शांतीचे प्रतीक म्हणून मानले जाते. ऑलिम्पियातले हे खेळ पाहण्यासाठी फक्त पुरुष, लहान मुलं आणि अविवाहित मुलींनाच परवानगी होती. लग्न झालेल्या महिलांना खेळ बघण्यास परवानगी नव्हती. आणि जर का हा नियम मोडला तर त्याला कडेलोट करण्याची शिक्षा असायची. पण पुढे ग्रीक संस्कृतीचा प्रभाव कमी होत गेला, तस तसा हे खेळ मागे पडत गेले आणि काहींना त्यांचा विसर पडत गेला.

त्यानंतर पुन्हा आधुनिक ओलीम्पिकचा जन्म झाला. डॉ. विल्यम पेनी ब्रुक्स यांनी त्यांच्या गावातील म्हणजेच मच वेनलॉक हे बाजारपेठेचे शहर असणाऱ्या परिसरातील तरुणांना शिस्त लागावी यासाठी १८५० साली वेनलॉक ऑलिंपिक खेळाची सुरुवात केली होती. या वेनलॉक क्रीडा स्पर्धांमधूनच पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिंपिक खेळांच्या आयोजनाची प्रेरणा मिळाली होती. पण तरीही आधुनिक ऑलिम्पिकचं श्रेय हे पिएर द कुबेर्तान यांना दिलं जातं. कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतून फ्रान्समध्ये २३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली आणि दोनच वर्षांत म्हणजेच १८९६ मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.

बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी 1894 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ची स्थापना केली. ऑलिम्पिक खेळांची सुरुवात ही १८९६ मधे अथेन्समधून करण्यात आली. त्यावेळेला ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड, भारत यांच्यासह १४ देशांतील तब्बल २८० पुरुष खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले होते. त्याच्या चार वर्षांनंतर झालेल्या ऑलम्पिकमध्ये म्हणजेच १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा महिला सहभागी झाल्या. या ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या ९९७ खेळाडूंपैकी २२ महिला होत्या.

प्राचीन काळात ग्रीस मधील ऑलिम्पियामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दर ४ वर्षांनी खेळ म्हणजेच ऑलम्पिकमध्ये तीच परंपरा पुढे सुरूच राहिली आणि तेव्हापासूनच दोन ऑलम्पिकमध्ये ४ वर्षांचा गॅप असतो. या 4 वर्षांच्या काळाला ऑलिम्पियाड असं म्हणतात. ऑलम्पिक चे ते पाच वेगवेगळ्या रंगांचे बोधचिन्ह तुम्ही पहिले असेल. याला ऑलिंपिक रिंग्स म्हटलं जातं जगभरात असणाऱ्या अब्जावधी लोकांचं प्रतिनिधित्व या रिंग करतात. पांढऱ्या रंगावर निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल या पाच समान आकाराच्या रिंग एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. जगभरातील लोकं एकत्र येऊन खेळतात आणि आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात हेच या ऑलम्पिक च्या चिन्हाचं प्रतीक आहे. ऑलिंपिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांनी पहिल्यांदा हा लोगो तयार केला होता आणि आजपर्यंत हाच लोगो वापरला जातो.

यंदाच्या म्हणजे २०२४ चे ऑलम्पिक हे पॅरिस मध्ये होणार आहे. म्हणजेच २०२४ ऑलम्पिकचे यजमानपद हे पॅरिसला मिळालं आहे. आता हे कोण निवडतं, तर आयओसीचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य बैठक घेतात आणि यजमानपदाची निवड करतात. गुप्त मतपत्रिकेद्वारे दिलेल्या बहुमताने यजमानाची निवड केली जाते.

ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी होतात. पण १९९४ पासून चार वर्षांच्या ऑलिम्पियाड दरम्यान दर दोन वर्षांनी उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक असे दोन वेगवेगळे बदल आहेत. यंदा पॅरिसमध्ये होत असणारे ऑलम्पिक हे २०२४ मधील उन्हाळी ऑलम्पिक आहे. आता हिवाळी ऑलम्पिक हे २०२६ मध्ये असेल. यंदाचे उन्हाळी ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पाड पडत आहे, ज्यासाठी १०,५०० खेळाडूंनी ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

ऑलम्पिक २०२४ साठी भारतातून ११२ भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ६६ पुरुष आणि ४७ महिला खेळाडू सहभागी असतील. याआधी म्हणजे २०२० मध्ये १२४ भारतातील खेळाडू ऑलम्पिक मध्ये सहभागी होते आत्तापर्यंत भारताची ही सर्वात नोटही सहभागी खेळाडूंची संख्या होती. त्या वर्षी म्हणजे २०२० मध्येच एकूण सात पदक भारताने मिळवली होती. २०२४ मध्ये शामिल भारतकडून शामिल होणाऱ्या खेळाडूंना अदाणी ग्रुप स्पॉन्सर करणार आहे. याबद्दल स्वतः अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा ट्विटरवर करून माहिती दिली आहे.

Sumber : Nonton Bola

Scroll to Top