Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

Security for narendra modi in delhi : 3000 पोलीस, NSG-SPG अधिकारी, 112 कॅमेऱ्यांची नजर; मोदींच्या शपथविधीला सुरक्षा कशी आहे?

narendra modi taking oath

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Taking Oath) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. यासाठी राष्ट्रीय राजधानीत कडेकोट बंदोबस्तात शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होईल. समोर येत असलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जेपी नड्डा कार्यक्रमानंतर सर्व एनडीए नेते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी डिनरचे आयोजन करतील.

या हाय प्रोफाईल कार्यक्रमासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन आणि ड्युटी पथाभोवती सुरक्षा दल तैनात आहे. ताज, मौर्य, लीला आणि ओबेरॉय हॉटेल्समध्ये परदेशी राष्ट्राध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेल्सच्या सुरक्षेसाठीही व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रीय राजधानीचे जणू एका अभेद्य किल्ल्यामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतंय. पुढील दोन दिवस संपूर्ण नवी दिल्ली परिसर किंवा ज्याला ल्युटियन्स दिल्ली म्हणतात ते नो फ्लाइंग झोन राहणार आहे.

दिल्ली पोलिसांचे 3 हजार कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय एनएसजी, एसपीजी आणि इंटेलिजन्स विंगचे अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत. नवी दिल्लीच्या हद्दीत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर निमलष्करी दलांसह दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शपथविधी समारंभाच्या आसपासच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी 112 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Scroll to Top